शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट तूरदाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:27 IST

महाराष्ट्र शासनातर्फे दारिद्रय रेषेखाली असलेल्या कुटुंबातील लोकांना तांदूळ, गहूसोबत तुरदाळसुद्धा माफक दरात राशन दुकानातून वाटप करण्यात येत आहे. मात्र वाटप करण्यात आलेल्या तुर दाळीचे काही पाकीट अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत.

ठळक मुद्देमोहाडीतील प्रकार : नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणामाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : महाराष्ट्र शासनातर्फे दारिद्रय रेषेखाली असलेल्या कुटुंबातील लोकांना तांदूळ, गहूसोबत तुरदाळसुद्धा माफक दरात राशन दुकानातून वाटप करण्यात येत आहे. मात्र वाटप करण्यात आलेल्या तुर दाळीचे काही पाकीट अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत.सिलबंद पाकीट असून सुद्धा त्यातील दाळ सडलेली आहे. तशी दाळ जनावरे सुद्धा खाणार नाहीत, अशी दाळ जनतेला देवून शासन गरीबांची थट्टा करीत आहे का असा सवाल नागरिक करीत आहेत.राशन दुकानातून देण्यात येत असलेली तुरदाळ महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमीटेड मुंबई करीता श्री सप्तश्रृंगी कंपनी, नवी मुंबई तथा सोनु मोने इंडस्ट्रीज, लगडगंज नागपूर यांनी प्रोसेसींग व पॅकेजींग केली आहे. सप्तश्रृंगी कंपनीने तर पाकीटावर बॅच नंबर, पॅकेजींगची तारीख सुद्धा टाकलेली नाही. मोहाडी येथील राशन दुकानात आलेल्या तुर दाळीच्या पाकीटापैकी काही पाकीटातील दाळ सडलेल्या अवस्थेतील आहे. राशन दुकानदारांनी सुद्धा त्या पाकीटाची तपासणी न करता निकृष्ट दर्जाची ती दाळ राशन कार्ड धारकांना दिली. काही जागरूक नागरिकांनी याची तक्रार येथील अन्न निरीक्षक बावरे यांच्याकडे केली असता त्यांनी ते निकृष्ठ दर्जाचे पाकीटे बदलवून दिले.चना, उळद डाळ आलीच नाहीशासनाने जनतेला दिवाळी भेट म्हणून राशन दुकानातून चणा व उळद दाळ देण्याची घोषणा केली होती. मात्र या दाळीचा कोटा कमी प्राप्त झाल्याने मोहाडी येथील काही राशन दुकानात दिवाळीला चणा व उळद दाळ आलीच नाही.ही दाळ डिसेंबरच्या राशन सोबत देण्यात येईल, असे सांगण्यात आले. एवढेच नाही तर जेवढे कार्डधारक आहेत त्यापैकी अर्ध्या कार्डधारकांनाच ही दाळ मिळेल. कारण सर्व कार्डधारकांना वाटप करता येईल इतकी दाळ मोहाडी तहसिल कार्यालयाला पाठविण्यात आलेली नाही.शासन घोषणा अवश्य करते मात्र त्याची अंमलबजावणी करीत नाही, अशी भावना अनेक गरीब नागरिकांनी व्यक्त केली आहे.एक दोन दाळीचे पाकीट खराब निघाले असतील पण तशी तक्रार आली नाही. सर्वांना मिळेल एवढा चना व उळद दाळीचा पुरवठा झालेला नाही तसे आमचे प्रयत्न सुरू आहे.-सागर बावरे, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय मोहाडी.