शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील ‘चॅटिंग’ पडली महागात

By admin | Updated: May 23, 2016 00:37 IST

फेसबुकवर आपत्तीजनक मजकूर व छायाचित्र पोस्ट केल्यामुळे मोहाडी पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील पारस या गावातील एका तरुणाला अटक केली आहे.

तरुणाला अटक : युवक-युवतींना सोशल मीडियावर सावधान होण्याची गरजमोहाडी : फेसबुकवर आपत्तीजनक मजकूर व छायाचित्र पोस्ट केल्यामुळे मोहाडी पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील पारस या गावातील एका तरुणाला अटक केली आहे. त्याला मोहाडी येथे तपासासाठी आणण्यात आले आहे.मोहाडी परिसरातील एका युवतीशी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील एका तरूणाने फेसबुकद्वारे ओळख केली. ओळखीचे रूपांतर हळूहळू मैत्रीत झाले. त्यानंतर मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर हा तरूण मोहाडीत येऊन त्या तरुणीशी भेटायचा. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही तरूणी शासकीय कर्मचारी आहे. हा तरूण शिक्षण घेत असला तरी उच्चशिक्षीत असल्याचे तिला सांगितले होते. त्यावरून युवतीला त्याचा संशय आल्याने तिने त्याची चौकशी केली असता त्याचे बिंग फुटले. खोटे का बोललास या कारणावरून त्या युवतीने त्याच्याशी सबंध तोडले. मात्र त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. आपल्याशी ती लग्न करणार नसल्याचे लक्षात येताच त्या तरूणाने फेसबुकवर आपत्तीजनक मजकूर व छायाचित्र अपलोड केले. त्यामुळे त्या युवतीची बदनामी झाली. त्यानंतर त्या युवतीने थेट मोहाडी पोलिस ठाणे गाठून त्या तक्रार दाखल केली.मोहाडी पोलिसांनीही या प्रकरणात तत्परता दाखवून सायबर सेलच्या मदतीने त्या युवकाचा पत्ता शोधून काढला व त्याला जेरबंद केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनात एपीआय सुहास चौधरी, जगन्नाथ गिरीपुंजे हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)आरोपीचे नाव सांगण्यात पोलिसांचा नकारया प्रकरणातील तरुणाचे नाव जाहिर करण्यास मोहाडी पोलिसांनी नकार दिला आहे. त्यामुळे त्याचे नाव प्रकाशित करता आले नाही. सध्या सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापरहोत असून चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टींचा मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे. सोशल मीडियावर आपत्तीकारक मजकूर, छायाचित्र किंवा व्हिडीओ टाकणे हा गुन्हा असून सायबर सेलद्वारे त्याचा तपशील शोधून काढून अटक होऊ शकते. त्यामुळे युवकानी फेसबुक, व्हॉट्सअप या सोशल मीडियावरील मजकूर किंवा छायाचित्र जरा सांभाळून पोस्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा या प्रकरणातील युवकासोबत जे घडले ते कोणासोबतही घडू शकते. या युवकावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचे शासकिय नोकरीचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे युवक युवतींनी सावधान होण्याची गरज आहे.