शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

वातावरणातील बदल ठरताहेत घातक

By admin | Updated: June 18, 2016 00:26 IST

वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे.

कधी आभाळ तर कधी उन्हाचा तडाखा : ताप, सर्दी, खोकल्याचे आजार वाढले, आबालवृध्द हैराणभंडारा : वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालय, दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या जीवसृष्टीला वातावरणानुसार जगण्याची सवय पडलेली आहे. त्यात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वातावरणाशी समरस होण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती प्रबळ आहे, त्यांना अशा आजारांवर मात करणे शक्य होते. परंतु सर्वाना ते शक्य नसल्यामुळे काहींना आजाराचा सामना करावा लागतो. या वर्षात ऊन तापायला सुरूवात झाली. वातावरणात अचानक बदल घडत गेले. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी ढगाळ वातावरण असाच यावर्षीच्या उन्हाळ्याचा अनुभव आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून ग्रामीण भागासह शहरात देखील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. वातावरणातील अचानकपणे होत असलेल्या बदलामुळे दैनंदिन सवयीत बदल होत असल्यामुळे शरीराच्या व्यवस्थापनात बदल होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घशाचा आजार उद्भवतात. तसेच लहान मुलांना वातावरणाशी समरस होण्याची सवय नसते. त्यांना वेगवेगळ्या ऋतुचा अनुभव नसतो. त्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. कधी दिवसभर ढगाळ वातावरण तर कधी सकाळपासून कडक उन्हाचे चटके यामुळे थंड वातावरणातून अचानक तीव्र तापमानाशी समरस होणे अशक्य असते. त्यामुळे आजाराचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात अधिक तापमान राहत असताना थंड पाणी, सरबत, ज्युश पिण्यात येतात. कुलर, एसीमध्ये राहून शरीराला आवश्यक ते वातावरण निर्माण केले जातात. पण अचानक पाऊस आल्यास वातावरणात गारवा निर्माण होतो. त्यामुळे शरीराला झालेली सवय एकदम बदलणे शक्य नसते. परिणामी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. (नगर प्रतिनिधी)काळजी घ्यावीउन्हात अधिक काळ बाहेर फिरणे टाळावे, पाणी स्वच्छ असण्याची काळजी घ्या, पाणी उकळून थंड करुन प्यावे, हात वारंवार धुवा, डासांपासून बचाव करा, स्वच्छता पाळा, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांनी रुमाल बांधावा. उन्हातून आल्याबरोबर थंड पदार्थ सेवन करू नका. बाहेरून आल्यावर अचानक कूलर, एसीची हवा घेण्याचे टाळावे. बर्फ गोळा खाण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. त्यावर टाकण्यात येणारे पदार्थयुक्त कलर कसे बनतात, त्यात साकरीनचे प्रमाण किती असतात याची माहिती घ्या. पण शक्यतोवर असे पदार्थ खाण्याचे टाळणेच योग्य राहील.