शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बदलले रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठलेही काम पूर्ण करण्याचा दृढ संकल्प केल्यास व त्याला मेहनतीची जोड मिळाल्यास ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. अशीच प्रचिती लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बदललेल्या स्थितीचे पाहून येते. भकास स्थितीत असलेल्या या दवाखान्याचे रूपडे पालटले असून पशुधन विकास अधिकाऱ्याच्या पुढाकाऱ्याने हा दवाखाना अन्य तालुकांसमोर आदर्श ठरला ...

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : पशुधन विकास अधिकाऱ्याचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठलेही काम पूर्ण करण्याचा दृढ संकल्प केल्यास व त्याला मेहनतीची जोड मिळाल्यास ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. अशीच प्रचिती लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बदललेल्या स्थितीचे पाहून येते. भकास स्थितीत असलेल्या या दवाखान्याचे रूपडे पालटले असून पशुधन विकास अधिकाऱ्याच्या पुढाकाऱ्याने हा दवाखाना अन्य तालुकांसमोर आदर्श ठरला आहे.जिल्ह्यात एकीकडे पशुधनाची संख्या सातत्याने रोडावत असताना शासन व प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत शासनातील अधिकाऱ्यांचे मनोधैर्य उच्च कोटीचे असल्याचे लाखनी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कामे पाहून दिसून येते. एक महिन्यापुर्वी लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मध्ये भंडारा पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागातील डॉ. गुणवंत भडके हे पशुधन विकास अधिकारी म्हणून लाखनीत रूजू झाले. यावेळी हा दवाखाना अत्यंत भकास स्थितीत होता. परिस्थितीची जाणीव लक्षात घेत डॉ. भडके यांनी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना तथा ग्रामस्थांना विश्वासात घेवून या दवाखान्याचे स्वरूप बदलण्याचा संकल्प सोडला.अल्पावधीतच सर्वांच्या श्रमदानातून या दवाखान्याचे स्वरूप बदलले. भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली. दवाखान्याचे नावही दिसत नव्हते. ठळकपणे आता ते दिसू लागले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली झाडे, झुडपी वाढली होती. येणाऱ्या गोपालकांना हा पशुवैद्यकीय दवाखाना भंगारावस्थेत आहे की काय असा वाटायचा. मात्र डॉ. भडके व त्यांच्या चमूने या संपूर्ण परिसराचे कायापालट करून रंगरंगोटी व ठिकठिकाणी वृक्षारोपणही केले. दवाखान्यातील सोयी-सुविधांचाही व देखरेखीची जबाबदारीही त्यांनी यशस्विरित्या सांभाळली आहे. ही बाब अन्य तालुक्यांसाठी आदर्श ठरत आहे.