शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत चंद्रपूर मनपा अव्वलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:43 IST

गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी, सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम देशपातळीवर राबविण्यात आली.

ठळक मुद्देअभिमानास्पद बाब : उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सत्कार

चंद्रपूर : गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी, सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम देशपातळीवर राबविण्यात आली. या मोहिमेत संयुक्त प्रयत्नांनी चंद्रपूर महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आली असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जनतेच्या सहकार्याने शासकीय योजनाही १०० टक्के यशस्वी करता येतात, याचे उदाहरण चंद्रपूर शहरातील जनतेने देशासमोर ठेवल्याचे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.गोवर-रुबेला मोहिमेत शाळेतील १०० टक्के लाभार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण केलेले मुख्याध्यापक, सक्रिय सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्था व उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.मनपाच्या आरोग्य विभाग प्रमुख तथा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी प्रस्ताविकेत सांगितले की चंद्रपूर मनपातर्फे राष्ट्रीय गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबर २०१८ ते १५ फेब्रुवारी २०१९ दरम्यान राबविण्यात आली होती. ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील चंद्रपूर शहरातील एकूण ८३ हजार ८७० लाभार्थ्यांपैकी एकूण ८३ हजार ४२ (९९%) लाभार्थ्यांचे मनपाने यशस्वीरीत्या लसीकरण केले.जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी(शिक्षण) गणेश चव्हाण यांनी मोहिमेसाठी योगदान दिले. आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत, आय.ए.पी. अध्यक्ष डॉ एम. जे. खान व लायन्स क्लब अध्यक्ष शैलेश बांगला यांनी व त्यांच्या संस्थेतील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मनपाला या मोहीमेची यशस्वी अमलबजावणी करण्यास मोलाचे सहकार्य केले. मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी शरद नागोसे, सतीश अलोने, प्रवीण गुळघाणे, ज्योती व्यवहारे, शारदा भुक्या, सुकेशीनी बिलिवाने, गणेश राखूनडे, एम.आर. नोडल ग्रुप मधील डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ नरेंद्र जनबंधु, ग्रेस निठुरी आणि सात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला.