शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समित्यांसमोर आव्हान

By admin | Updated: September 21, 2015 00:26 IST

राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गावागावांत स्थापन करण्यात आलेल्या या समित्यांपुढे मात्र अवैध धंद्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अवैध धंदे बोकाळले : समित्यांनी समुपदेशनासह पोलिसांचीही मदत घ्यावीभंडारा : राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गावागावांत स्थापन करण्यात आलेल्या या समित्यांपुढे मात्र अवैध धंद्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत. दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्यांचे निराकरण करून ते कमी करणे. गावासाठी गावातच लोकसहभागातून तत्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे, गावातील व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मूलन करणे, अनिष्ट प्रथा व चालीरीती नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आदी उद्दिष्ट समोर ठेवून या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करून गावाचा विकास साध्य करावयाचा असतो. अवैध धंदे, धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापीही साध्य होणार नाही. दारू, मटका, वरली हे भांडण तसेच शांतता धोक्यात येण्याचे मूळ कारण आहे. यामुळे अशा अवैध धंद्यालाच मूठमाती दिली तर गावांची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल होण्यास वेळ लागणार नाही. यावर शिक्कामोर्तब करून गावकऱ्यांच्या सहकार्याने तंटामुक्त गाव समितीने अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे शासनाने सुचविले आहे.त्या दृष्टीने प्रत्येक गावातील तंटामुक्त समितीने अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करणे, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबविणे, व्यसनी लोकांचे समुपदेशन करणे, आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेणे वा इतर कामी पोलिसांना सहकार्य करणे ही कामे समिती पदाधिकाऱ्यांना करावी लागतात. भांडण तंटे व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दारूला गावातून हद्दपार करण्याचे कर्तव्य तंटामुक्त गाव समित्यांनी पोलिसांच्या सहकार्याने पार पाडणे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अपेक्षित आहे. मात्र याचा विसर बहुतांश समितीच्या पदाधिकाऱ्यांना पडल्याने गावात दारूसह अवैध धंद्याचे अस्तित्व अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.गावात शांतता राहावी, गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा. यासाठी प्रत्येक तंटामुक्त गाव समितीने सभा बोलावून गावात असलेले अवैध धंदे हद्दपार करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. तसेच त्याची प्रत पोलीस ठाण्याला द्यावी. अवैध धंदे करणाऱ्या धंदेवाईकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे आणि अवैधधंदे बंद करण्यासाठी विनवणी करावी. तरीही अवैध धंदे बंद होत नसतील तर संबंधित पोलीस ठाण्याचे सहकार्य घेऊन त्यावर योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने करणे तंटामुक्त गाव मोहिमेसाठी अतिशय आवश्यक आहे. तरच समित्यांना बळ येऊ शकणार आहे. (शहर प्रतिनिधी)