शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खाण सुरू करण्यासाठी चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायतींनी ठराव करून खाण सुरू करण्याची मागणी केली. त्यावरून राज्य शासनाने केंद्र सरकारला खाण सुरू करण्यासाठी परवानगीची मागणी केली. मात्र, दोन वर्षांपासून केंद्राकडून दुर्लक्ष होते. केंद्राने गत काही वर्षांत विविध शासकीय कंपन्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. दहेगाव येथील कायनाईट खाण विक्रीचा त्यांचा डाव तर नाही ना ? अशी शंका माजी आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी व्यक्त केली.

ठळक मुद्देबारव्हा येथे जनआक्रोश आंदोलन : तालुका राष्ट्रवादीचा पुढाकार

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील दहेगाव येथील गत ३० वर्षांपासून बंद असलेली कायनाईट खाण सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारव्हा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, विजय सावरबांधे, हेमकृष्ण वाडीभस्मे, अतुल परशुरामकर, तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, मोहन राऊत, राकेश राऊत, कल्पना जाधव, देविदास राऊत, सूरज मेंढे, सुनीता बिसेन, गीता लंजे, शकुंतला भैय्या, उषा झोडे, राजश्री मालेवार, वंदना गाकरे, निशा बगमारे, नरेश दिवठे, मिलिंद डोंगरे, बबन पिलारे, संतोष गोंधळे, गोविंदराव बरडे, अमोल बिडवाईक, जिकरीया पठाण, शंभू नैताम, विजय फुंडे, धनराज वासनिक, निवृत्ती ढोरे, रोषण बनकर सहभागी झाले हाेते. आंदोलनस्थळी जिल्हा खणीकर्म अधिकारी गजभीये यांना निवेदन देऊन कायनाईट खाण सुरू करण्यासंबंधाने केंद्र सरकारकडे आवश्यक कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. 

दहेगाव खाण विकण्याचा तर डाव नाही - राजेंद्र जैन- लाखांदूर तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायतींनी ठराव करून खाण सुरू करण्याची मागणी केली. त्यावरून राज्य शासनाने केंद्र सरकारला खाण सुरू करण्यासाठी परवानगीची मागणी केली. मात्र, दोन वर्षांपासून केंद्राकडून दुर्लक्ष होते. केंद्राने गत काही वर्षांत विविध शासकीय कंपन्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. दहेगाव येथील कायनाईट खाण विक्रीचा त्यांचा डाव तर नाही ना ? अशी शंका माजी आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी व्यक्त केली. ही लढाई आपण पूर्ण ताकदीनिशी लढू, असे त्यांनी यावेळी सांगितले....तर तीव्र आंदोलन करणार - सुनील फुंडे-  गत ३० वर्षांपासून कायनाईट खाण बंद पडल्यामुळे या भागातील तीन हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. केंद्र सरकारने सहा महिन्यांत खाण सुरू करण्यासाठी परवानगी न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगारांना सोबत घेऊन जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिला.

 

टॅग्स :Chakka jamचक्काजाम