शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सभापतिपदाची चावी शिवसेनेकडे

By admin | Updated: July 10, 2015 01:09 IST

तुमसर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीकरिता रस्सीखेच सुरू असून ...

राष्ट्रवादी मैदानात : निवडणूक तुमसर पं.स. सभापती, उपसभापतीपदाचीतुमसर : तुमसर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीकरिता रस्सीखेच सुरू असून भाजप तथा राकाँत मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सेनेचे दोन मते येथे निर्णायक ठरणार आहे. येथे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता राखीव आहे.तुमसर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक १२ जुलै रोजी होत आहे. २० सदस्यीय पंचायत समितीमध्ये भाजपचे सर्वाधिक ९ सदस्य, राकाँ ७, सेना २, काँग्रेस १, अपक्ष १ अशी स्थिती आहे. येथे बहुमताकरिता ११ सदस्यांची गरज आहे. भाजप व सेना २ एकत्र आले तर सभापती व उपसभापतीपद त्यांना सहज प्राप्त होते. येथे राकाँ ७, अपक्ष १, काँग्रेस १ व सेना २ असे समीकरण जुळले तर राकाँचा सभापती होऊ शकतो अशी सध्या चाचपणी सुरू आहे, परंतु सेनेकडे शेखर कोतपल्लीवार व जितेंद्र सरीयाम दोन्ही पुरूष असल्याने त्यांना राकाँकडे गेल्यावरही उपसभापतीपदावरच समाधान मानावे लागेल. त्यामुळे राकाँकडे सेनेचे दोन्ही सदस्य जाण्याची शक्यता कमीच आहे.मागील खेपेला तुमसर पंचायत समितीवर भाजपचेच वर्चस्व होते. पुन्हा ते वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता प्रयत्नशिल आहेत. भाजपकडून सभापती करिता कविता बनकर व उपसभापती करीता शिवसेनेचे शेखर कोतपल्लीवार यांच्या नावाची चर्चा आहे तर राकाँकडून सरीता गौपाले यांचे नाव आघाडीवर आहे. (तालुका प्रतिनिधी)