शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अध्यक्ष रमेश डोंगरे तर उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:54 IST

५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने सत्ता काबिज केली होती.

ठळक मुद्देभंडारा जिल्हा परिषद निवडणूक : विजयाच्या घोषणेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

आॅनलाईन लोकमतभंडारा : ५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने सत्ता काबिज केली होती. त्यावेळीही आघाडी करून सत्ता स्थापन केली होती आणि आताही आघाडी केली. आगामी अडीच वर्षांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रमेश डोंगरे हे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडणुकीसाठी सोमवारला दुपारी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभेचे अयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता राखीव असलेल्या अध्यक्षपदाकरीता काँग्रेसचे रमेश डोंगरे, रेखा वासनिक व भाजपचे नेपालचंद रंगारी यांनी नामांकन दाखल केले होते. उपाध्यक्षपदाकरीता राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर, काँग्रेसचे विनायक बुरडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे व भाजपच्या निलीमा ईलमे यांनी नामांकन दाखल केले होते. दरम्यान काँग्रेसच्या रेखा वासनिक यांनी नामांकन मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे रमेश डोंगरे व भाजपचे नेपाल रंगारी यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात डोंगरे यांना ३९ मते तर रंगारी यांना १२ मते मिळाली. त्यानंतर डोंगरे यांना विजयी घोषित करण्यात आले.उपाध्यक्षपद निवडणुकीतून विनायक बुरडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर व भाजपच्या निलीमा ईलमे यांच्यात निवडणूक झाली. कुर्झेकर यांना ३९ मते तर ईलमे यांना १२ मते मिळाली. त्यानंतर कुर्झेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. सभेला जिल्हा परिषदेचे ५२ सदस्यांसह सात पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी काम पाहिले.अशी मिळाली काँग्रेस-भाजपला मते५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे १५, भाजपचे १३, शिवसेना एक आणि अपक्ष चार असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रमेश डोंगरे यांना काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे १५, अपक्ष चार आणि सेनेचा एक अशी ३९ मते मिळाली. तर भाजपला १३ पैकी १२ मतांवर समाधान मानावे लागले. अडीच वर्षापूर्वीपेक्षा भाजपची आताची स्थिती काहीशी कमी झाली आहे.महिलांच्या रुद्रावताराने दीपक मेंढे भाजपातमागील तीन दिवसांपासून जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे व सुभाष आजबले हे नाना पटोले यांच्या संपर्कात होते. किंबहूना त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टीने दोन दिवसांपासून भ्रमणध्वनी बंद ठेऊन भाजपपासनू दूर होते. दरम्यान आज दीपक मेंढे व सुभाष आजबले हे सभागृहात दिसताच भाजपच्या महिला सदस्यांनी रुद्रावतार दाखविला. महिलांच्या आक्रमक पावित्र्याने मागील दोन दिवसांपासून भाजपापासून दूर पळणाºया दीपक मेंढे यांनी परिस्थिती ओळखून मतदानाच्या अखेरच्या क्षणात भाजपच्या गटात सहभागी होऊन भाजपकडून मतदान केले.भाजपचे सुभाष आजबले राहिले तटस्थभाजपचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले हे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजप नेतृत्त्वावर नाराज होते. त्यामुळे या निवडणुकीत ते नाना पटोले यांच्यासोबत राहिले. भाजपचे गटनेता भालाधरे यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप बजावले. व्हीप घेऊनही सुभाष आजबले यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मतदानाच्यावेळी ते भाजप उमेदवाराला मतदान केले नाही. आजबले यांच्यावर पक्ष कोणती कारवाई करतो आणि काँग्रेस कोणती बक्षिसी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सभागृहात धक्काबुक्कीया निवडणुकीत भाजपचे दोन सदस्य काँग्रेसच्या गटात सहभागी झाल्यामुळे भाजपचे संख्याबळ दोनने कमी झाले होते. सोमवारला मतदान प्रक्रियेदरम्यान हे दोन सदस्य सभागृहात सर्व सदस्यांसह एकत्र आले. यावेळी भाजपच्या महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत या दोघांना त्यांच्या भूमिकेबाबत जाब विचारला. यावेळी धक्काबुक्की केली. हे एकमेव गालबोट वगळता निवडणूक शांततेत पार पडली.शिवसेना सदस्याची हुकली संधीगणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या जया सोनकुसरे या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेससोबत होत्या. यावेळी राष्टÑवादीकडे सभापतीपदाची मागणी केली. ही मागणी राष्ट्रवादीने क्षणार्धात धुडकावून लावल्याने सोनकुसरे यांनी काँग्रेसच्या वाघाये यांच्याशी हातमिळवणी केली. मात्र या निवडणुकीत वाघाये गटाला अध्यक्षपद न मिळाल्यामुळे सोनकुसरे यांना देऊ केलेल्या सभापतीपदाची संधी हुकली आहे.समविचारी पक्ष आणि सदस्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत रमेश डोंगरे यांना अध्यक्ष करण्यात आले. आता राज्यात आणि देशात काँग्रेसचे सरकार आणण्याचा मानस आहे. लोकांना रयतेचे सरकार हवे आहे. त्याची ही सुरुवात आहे.- नाना पटोले, काँग्रेस नेतेमतदान प्रक्रियेसाठी भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावले होते. जि.प. सदस्य सुभाष आजबले यांनी पक्षाचे व्हीप स्वीकारूनही पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता तटस्थ राहिले. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध पक्षविरोधी कार्यवाही करण्यात येईल.- अरविंद भालाधरे, गटनेता भाजप जि.प. भंडारा