भंडारा : चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे दागिने घालणे जीवघेणे झाले आहे. एकेक पैसा गोळा करून मोठय़ा हौसेने खरेदी केलेले दागिने घालून बाहेर पडावे आणि एखाद्या भामट्याने त्यावर हात मारून स्वप्रांचा चुराडा करावा, असा प्रकार केव्हाही, कुठेही व कोणासोबतही घडू शकतो. त्यामुळे दागिने घालणार्यांनी पावलोपावली सावध राहण्याची गरज आहे. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. सराईत गुन्हेगारांसाठी हेच संधीचे दिवस असल्यामुळे ते अनेकांच्या मागावर असतात. त्यामुळे तुम्हीच दक्ष राहा आणि काळजी घ्या. वाढत्या गुन्हेगारीमुळे आजच्या काळात मानवी जीवन असुरक्षित झाले आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत कोणीही आपल्या जीवाची वा संपत्तीच्या सुरक्षिततेची हमी देवू शकत नाही. गेल्या काही महिन्यातील घटना पाहता चेन स्कॅचिंग गंभीर समस्या झाल्याचे स्पष्ट होते. चेन स्कॅचिंगसाठी वेगवान दुचाक्या वापरल्या जातात. यामुळे घटना घडली त्याचवेळी चोरट्यांना पकडणे शक्य होत नाही. काही कळायच्या आतच ते नजरेआड होतात. चेन स्कॅचिंग कधी कधी दागिन्यांवर निभावते, पण कधी जीवावरही बेतते. यामुळे महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक झाले आहे. (नगर प्रतिनिधी)
चेन स्नॅचिंगमुळे हौस झाली जीवघेणी
By admin | Updated: May 15, 2014 23:15 IST