शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रस्ता दुरुस्ती विना दिले प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

बरडकिन्ही दुर्गम परिसर असून या परिसरातील जनतेला या मार्गानेच वाहतूक करावी लागते. मुंडीपार ते भूगाव रस्ता अनेकांना सोयीस्कर ठरतो. मुंडीपार ते बरडकिन्हीपर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम झाले आहे. बरडकिन्ही ते मिरेगावपर्यंत रस्त्याची दयानिय अवस्था झाली आहे. त्यामुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देउपविभागीय अभियंत्याचा प्रताप : प्रकरण बरडकिन्ही जोड रस्ता दुरुस्तीचे

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागातील विकास कामे कनिष्ठ शाखा अभियंत्याकडून पूर्ण केल्यानंतर त्याची पाहणी करूनच काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी उपविभागीय अभियंत्याची आहे. मात्र लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही गावचा जोड रस्ता दुरुस्ती केला नसतांनाही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अभियंत्याकडून दिले गेल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.बरडकिन्ही दुर्गम परिसर असून या परिसरातील जनतेला या मार्गानेच वाहतूक करावी लागते. मुंडीपार ते भूगाव रस्ता अनेकांना सोयीस्कर ठरतो. मुंडीपार ते बरडकिन्हीपर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम झाले आहे. बरडकिन्ही ते मिरेगावपर्यंत रस्त्याची दयानिय अवस्था झाली आहे. त्यामुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग, साकोलीने २०१९-२० मध्ये रस्ते दुरुस्ती लेखशिर्ष अंतर्गत बरडकिन्ही जोडरस्ता ग्रामीण मार्ग १८८ वर ० ते १ किलोमीटर अंतरातील खड्डे बुजविण्यासाठी दोन लाख ५० हजार रुपये किंमतीच्या कामास मंजुरी दिली. हे काम एका सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला करावयास दिले होते. तसा कायार्रंभ आदेशही संबंधित विभागाने दिला होता. परंतु कंत्राटदार शाखा अभियंत्यांनी संगनमत करून दुरुस्तीचे काम न करताही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काम झाल्याचे सांगितले व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले.काम झाले किंवा नाही याची खातरजमा करूनच उपविभागीय अभियंत्याने पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देणे गरजेचे होते. परंतु उपविभागीय अभियंत्याने कोणत्याही प्रकारची चौकशी किवा पाहणी न करता काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याने त्यांच्याच आशीवार्दाने हा प्रकार झाला नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकाºयांनी बरडकिंन्हीं जोड रस्ता प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य काय ते जनतेसमोर आणून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. आता काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे.काम करणारा तो कंत्राटदार कोण?बरडकिन्ही जोड रस्ता ग्रामीण मार्ग १८८ येथे एक किमी रस्ता दुरुस्तीचे कंत्राटदार बेलाटी (लाखांदूर) येथील सुुशिक्षीत बेरोजगार अभियंत्याला देण्यात आले. पण काम न करताच काम झाल्याचे सूचना फलक कार्यकारी अभियंत्यांकडून रस्त्यावर लावण्यात आले. त्यामध्ये कंत्राटदाराच्या नावासमोर तुमसर असे दर्शवण्यात आले असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.असे आहे कामाचे स्वरूपबरडकीन्ही जोड रस्ता ग्रामीण मार्ग १८८ मधील ० ते १ किमीमधील रस्त्यावर असलेले खड्डे समप्रमाणात डांबर आणि चुरीचे मिश्रण करून बुजविण्यात यावे, त्यानंतर त्यावर रोलर फिरवून रस्त्याचे समपातळीत करावे असे स्वरूप आहे. मात्र रस्ता दुरुस्ती न करता कागदोपत्री दाखविण्यात आले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक