शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शतकोटी वृक्षलागवड योजनेचा फज्जा

By admin | Updated: September 19, 2015 00:36 IST

शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा पावसाअभावी फज्जा उडालाअसून शासनाला यावर्षी ही योजना गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे.

आर्थिक भुर्दंड : फटका पावसाचासाकोली : शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा पावसाअभावी फज्जा उडालाअसून शासनाला यावर्षी ही योजना गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. पावसाने दडी मारल्याने धानपिकानी माना टाकल्या आहेत. अशा स्थितीत महसुल व वनविभागाने शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी निर्धारित केलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कसे पुर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महसूल आणि वनविभागाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यासाठी ६ कोटी ४४ लाख ५६ हजार वृक्षांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामध्ये वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, ग्रामविकास व जिल्हा परिषदवार कृषी विभाग व इतर विभागाचा यात समावेश आहे. हे उद्दिष्ट विभाग व जिल्हानिहाय देण्यात आले आहेत. निसर्गाने लहरीपणा दाखविल्याने सध्या जिल्ह्याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून साकारलेले नाला बंधारे, माती नाला बंधारे, यामध्ये पाणी कमी आले. त्यामुळे झाडे लावल्यानंतर ती जगण्याची शक्यता खूपच कमी आहे. पाऊस सुरु असताना झाडे लागली गेली असली तर ती काही प्रमाणात जगली असती. परंतु आता पावसाने मोठी अडचण निर्माण केली आहे. शतकोटी योजनेचे उद्दिष्टे पूर्ण झाले तरी लावलेली झाडे जगणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाही परिस्थितीत महसुल व वनविभागाने शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत राज्यात ६ कोटी ४४ लाख ५६ हजार झाडे लावण्याचे नियोजन करुन आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जिल्हानिहाय व विभागनिहाय असून पावसाळा संपण्यापूर्वी ही झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था सहकारी संस्थाचा मदतीने हे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)