शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिला दगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:50 IST

अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ३५० रुपये प्रतीदिन वेतन देईल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी चार वेळा केली.

ठळक मुद्देदिलीप उटाणे : केंद्र शासनाच्या आश्वासनाची केली होळी

आॅनलाईन लोकमततुमसर : अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ३५० रुपये प्रतीदिन वेतन देईल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी चार वेळा केली. मात्र, केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दगा दिल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केला.तुमसर येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष सुनंदा बडवाईक, माजी महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, वंदना बघेले, रिता लोखंडे, मंगला गभणे, कल्पना गेडाम, शारदा रामकर, सुनंदा हेडाऊ, संध्या सार्वे, रेखा चकोले, फुलन कोकोडे, शालीनी गोडबोले आदी उपस्थित होते.यावेळी उटाणे यांनी, बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ जाहीर होईल असे वाटत होते. परंतु शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. फक्त आश्वासनाने पोट भरत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दगा दिला. महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक महिना संप केला. मुख्यमंत्री यांनी संघटना प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यात त्यांनी सेवाज्येष्ठतेप्रमाणे मानधन वाढ, भाऊबीज भेट वाढ आदी बाबींवर चर्चा केली. मानधन वाढ १ आॅक्टोबर १७ पासून करण्यात येईल असे आश्वास दिले. परंतु आजपर्यंत आदेश काढले नसल्याचा आरोप उटाणे यांनी केला आहे.यावेळी शुभागी रहांगडाले, प्रतिक्षा कटरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी केंद्र शासनाने दिलेल्या आश्वासनानंतरही त्यांनी त्याची पूर्तता केली नसल्याने त्याचा निषेध करून होळी केली. मदतनिस मधून सेविका झालेल्या ललीता विठोले यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मंगला देशमुख यांनी केले. तर आभार सुरेखा ठवकर यांनी मानले.मेळाव्यासाठी इंदिरा मासूलकर, सविता सोयाम, बबिता सारंगपुरे, लक्ष्मी धुर्वे, मंदा सोलंकी, ओमलता इखार, समता सलामे, किरण गोल्हर, सुनिता गवरे, सविता ठाकरे यांच्यासह प्रत्येक गावातून आलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहकार्य केले.