शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी केंद्र-राज्य सरकार असंवेदनशील

By admin | Updated: April 1, 2017 00:37 IST

दिवसेंदिवस धान शेतीसाठी खर्च वाढत असूनही धानाला योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे,...

प्रफुल्ल पटेल यांचा आरोप : एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी करणार आंदोलनेभंडारा : दिवसेंदिवस धान शेतीसाठी खर्च वाढत असूनही धानाला योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, असे असतानाही केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्याविषयी गंभीर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शेतकरीविरोधी सरकारच्या धोरणांविरूद्ध येत्या १५ एप्रिलनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यात धरणे, आंदोलने, निदर्शने करणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु या तीन वर्षात जिल्ह्यात कुठलाही विकास शोधून सापडत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला खर्चावर आधारीत समर्थन मूल्य नाही.यापूर्वी देशात व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना शेतमालाला योग्य तो भाव देण्यात आला होता. देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले तर शेतकऱ्यांना समर्थन मूल्य वाढवून दिले जाईल, अशी आश्वासने लोकसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. परंतु मागील तीन वर्षांत एकही आश्वासने पूर्ण झालेली नाही. लोकसभा, विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली नाही. शेतमालाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च, मजुरी, बियाणांचा खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारनियमनाच्या समस्यांनी शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. पीकविमा योजनेचे काम खाजगी कंपनीला दिल्यामुळे एकाही शेतकऱ्याला पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या आहे. ‘भेल’ प्रकल्पाचे काम रखडले आहे. ‘अच्छे दिन’चा नारा देऊन निवडणुका जिंकणाऱ्या सरकारने जिल्ह्यात सुईच्या टोकाईतकाही विकास केलेला नाही. सामान्य माणसाचा जीवनस्तर तीन वर्षांत एक टक्काही सुधारलेला नाही. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण जिल्ह्यात धरणे, आंदोलने, मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अ‍ॅड.जयंत वैरागड़े, सभापती नरेश डहारे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)