शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

शिवणी ग्रामपंचायतीला केंद्राचा पुरस्कार

By admin | Updated: April 27, 2015 00:20 IST

पंचायत राजच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा पालटविलेल्या जिल्ह्यातील शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीचा शुक्रवारी दिल्लीत पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

केंद्रीय मंत्र्यांनी थोपटली पाठ : जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायतभंडारा : पंचायत राजच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा पालटविलेल्या जिल्ह्यातील शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीचा शुक्रवारी दिल्लीत पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सरपंच व सचिवांची पाट थोपटून गावाला प्रगतिपथावर नेण्याचा सल्ला दिला.जिल्ह्यातील लाखनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीने शासनाच्या सर्व योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळावा, यादृष्टिने उल्लेखनीय काम केले आहे. गाव विकासासाठी सरपंच पद्माकर बावणकर व सचिव जयंत गडपायले यांनी ग्रामपंचायतीच्या सव सदस्यांना विश्वासात घेऊन कामे केली आहेत. ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाने विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.सन २०१३-१४ मध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने शिवणीला केंद्रीय पुरस्कार मिळण्याच्या दृष्टिने प्रस्ताव पाठविला होता. याची दखल घेऊन केंद्रीय समितीने गावाची पाहणी केली व यात ते समाधानी आढळल्याने त्यांनी ग्रामपंचायतीला राजीव गांधी पंचायत राज सशस्क्तीकरण पुरस्कार मिळावा यासाठी प्रस्ताव केंद्राकडे सादर केला. याअनुषंगाने, ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. शुक्रवारी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या एका समारंभात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री बिरेंद्र सिंह, केंद्रीय राज्यमंत्री निहाल चंद यांच्या हस्ते देशातील २०३ ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कारासाठी राज्यातील १६ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात नागपूर विभागातून तीन ज्यात भंडारा जिल्ह्यातून शिवणी (मोगरा) ही एकमेव ग्रामपंचायत ठरली. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे सरपंच पद्माकर बावणकर व सचिव जयंत गडपायले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)