शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:40 IST

केंद्र आणि राज्य शासनाचे चुकीचे धोरणामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था व व्यवसाय गडगडले आहेत. गावाचे चित्र भकास झाले आहे. विकास शोधून सापडत नाही. ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. युपीए शासनाचे काळातील योजना केंद्र आणि राज्यात असणाऱ्या युतीच्या शासनाने बंद केल्या आहेत. यामुळे गावात उदासीनतेचे चित्र बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मोहगाव येथे ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : केंद्र आणि राज्य शासनाचे चुकीचे धोरणामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था व व्यवसाय गडगडले आहेत. गावाचे चित्र भकास झाले आहे. विकास शोधून सापडत नाही. ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. युपीए शासनाचे काळातील योजना केंद्र आणि राज्यात असणाऱ्या युतीच्या शासनाने बंद केल्या आहेत. यामुळे गावात उदासीनतेचे चित्र बघायला मिळत आहे. सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.तुमसर बपेरा राज्य मार्गावरील मोहगाव (खदान) येथे नवनिर्मित ग्राम पंचायत भवनाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार मधुकर कुकडे होते. नवनिर्मित ग्राम पंचायत भवनाचे उद्घाटन खासदार पटेल यांच्या करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अनील बावनकर, जिल्हा परिषदेचे सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, प्रेरणा तुरकर, विजय डेकाटे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन लांजेवार, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, उमेश तुरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठलराव रहमतकर, सरपंच उमेश कटरे, बिंदू मोरे उपस्थित होते.खा.पटेल म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीने ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेली आहेत. उज्ज्वला गॅस योजनेने महिलांना लॉलीपॉप ठरत आहे. गॅस खरेदी करणे मुश्कील झाले आहे.साडेचार वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने सामान्य जनतेचे दिवाळे काढले आहेत. युपीए आणि आघाडी शासनाच्या कार्यकाळात सिहोरा परिसरात महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण केला आहे. ग्राम पंचायत मध्ये निधी होता. परंतु अनेक योजना बंद करण्यात आल्याने निधी नाही.रोजगार हमी योजने अंतर्गत पैसे सुद्धा शासन वेळेवर देत नाही. जनधन योजनेत गरीबांनी खाते उघडले. परंतु ही योजना कुठे गायब झाली कळत नाही. केंद्र व राज्यातील सरकारला खुर्चीवरून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचेही ते खासदार पटेल म्हणाले.याप्रसंगी खासदार मधुकर कुकडे, सभापती धनेंद्र तुरकर यांचीही समयोचित भाषणे झाली. संचालन गजानन लांजेवार यांनी तर आभार सरपंच उमेश कटरे यांनी मानले.