शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीतील झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:01 IST

शहराच्या पूर्व-दक्षिण क्षेत्रातील वैनगंगा नदीकाठाला लागून असलेल्या स्मशानभूमी परिसरातील वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असून या वृक्ष कटाईचा तस्करांना चांगलाच फायदा होत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : मौल्यवान वनसंपदेचा होतोय ऱ्हास, महसूलही पाण्यात

लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : शहराच्या पूर्व-दक्षिण क्षेत्रातील वैनगंगा नदीकाठाला लागून असलेल्या स्मशानभूमी परिसरातील वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असून या वृक्ष कटाईचा तस्करांना चांगलाच फायदा होत आहे.भंडारा शहराच्या दक्षिण क्षेत्रात असलेल्या स्मशानभूमी परिसराची विस्तीर्ण जागा आहे. या स्मशानभूमीला लागूनच वैनगंगा नदीचे विशाल पात्र आहे. याच नदीकाठावर मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत.मागील दोन वर्षांपूर्वी गणेशपूर ते कारधा स्मशानभूमीपर्यंतच्या भागावरील सुपीक मातीचे खणन केले जात होते. त्या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून महसूल विभागाला कारवाई करण्यास भाग पाडले होते. आता तस्करांची नजर येथे असलेल्या वृक्ष संपदेवर गेली आहे.स्मशानभूमी परिसरात असलेली लहान मोठी झाडे कापण्याचा सपाटा सुरु असल्याचा नाव न सांगण्याच्या अटीवर नजीकच्या रहिवाशांनी सांगितले.सदर कापलेली वृक्ष थेट तस्करी होत असल्याचेही दिसून येत आहे. या संदर्भात वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेही जाणवते. वनसंपदेचा हा ऱ्हास पर्यावरण दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा असतानाही शासकीय संपत्तीच्या देखरेखीकडेही दुर्लक्ष होत आहे.या परिसरातून कोट्यवधी रुपयांची ही वनसंपदा तस्करांकडून चोरली जात असताना कुणीही बोलायलाही तयार नाहीत.जागरूक नागरिकांनी याची माहिती दिल्यावरही प्रशासन कारवाई करणार काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.ऐरवी स्मशानभूमी परिसरात अंत्यसंस्कारासाठी नागरिक जात असतात. परिणामी याकडे सहसा कुणी लक्ष देत नसल्याने याचाच फायदा लाकुड तस्कर उचलत असल्याचेही दिसून येते.