शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्ता बांधकामात गुणवत्तेला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:21 IST

येथील नगरपंचायत अंतर्गत करण्यात येत असलेल्या सिमेंट कॉंंक्रीट रस्त्याच्या बांधकामात गैरप्रकार करून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. यात गुणवत्तेला खो देण्यात येत आहे. काम सुरू करताना संबंधित विभागाच्या अभियंत्याने आपल्या देखरेखीखाली काम करून घेणे गरजेचे असताना मात्र अभियंताच कामावर येत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन कंत्राटदाराने कमी साहित्याचा वापर करून मनमर्जीने कामाला सुरुवात केली आहे. परिणामी सदर कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे सातत्याने दुर्लक्ष : कमी साहित्यांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : येथील नगरपंचायत अंतर्गत करण्यात येत असलेल्या सिमेंट कॉंंक्रीट रस्त्याच्या बांधकामात गैरप्रकार करून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. यात गुणवत्तेला खो देण्यात येत आहे. काम सुरू करताना संबंधित विभागाच्या अभियंत्याने आपल्या देखरेखीखाली काम करून घेणे गरजेचे असताना मात्र अभियंताच कामावर येत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन कंत्राटदाराने कमी साहित्याचा वापर करून मनमर्जीने कामाला सुरुवात केली आहे. परिणामी सदर कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.लाखांदुर येथील नगरपंचायत अंतर्गत शेष निधीतुन टि-पाँईट (शिवाजी चौक) ते नगरपंचायत कार्यालयापर्यत गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे नगर पंचायतीच्या वतीने सिमेंट काँंक्रीटचा रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सदर काम जिल्ह्यातील एका मजुर सहकारी संस्थेच्या नावाने असून, प्रत्यक्ष हा काम येथील़च अतांत्रिक व्यक्ती करीत असल्याची माहीती आहे. सदर काम सुरू करतांनी संबंधित विभागाचा अभियंता यांनी आपल्या निगराणीखाली काम करून घेणे गरजेचे आहे.मात्र संबंधित अभियंताच सदर कामाकडे ढुंकूनही न पाहता आपल्या अधिपत्याखालील अतांञिक व्यक्तीला पाठवून कामाचे ले-आऊट देत असतो. त्यानंतर कंत्राटदार याच संधीचा फायदा घेऊन मनमजीर्ने अंदाजपत्रकाला बाजूला ठेवून कमी साहित्य व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बेधडकपणे काम सुरू केलेले दिसून येत आहे. होत असलेल्या या नियमबाह्य बांधकामात नगर पंचायतीने लक्ष घालने गरजेचे असतांना मात्र त्यांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर कामाच्या गुणवत्तेवर गालबोट लागले आहे.सदर कामाची गुणवत्ता विभागाकडून तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.सदर कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने ठेकेदाराकडून मनमानी केली जात आहे. नगर पंचायतीला स्वतंत्र अभियंत्यांची गरज आहे.- देवानंद नागदेवे,नगरसेवक लाखांदुर