शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांच्या वस्तीत भाऊबीज साजरी

By admin | Updated: November 2, 2016 00:43 IST

समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भटक्या बांधवांनाही इतरांप्रमाणे दिवाळीचा आनंद घेता यावा ...

फुंकर आपुलकीची : भेट देणारे आणि भेट घेणारेही भारावलेभंडारा : समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भटक्या बांधवांनाही इतरांप्रमाणे दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून भटके विमुक्त परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभागांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील भटक्यांच्या चार वस्त्यांमध्ये आज मंगळवारला भाऊबीज साजरी करण्यात आली. भटक्या समाजातील बांधवांना ओवाळून त्यांना भेटवस्तू देण्यात आले. झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मिळालेले प्रेम आणि आपुलकी पाहून भटके समाजबांधव भारावलेले दिसत होते.आज एकीकडे प्रत्येक सणांचा स्वच्छंदपणे आनंद घेतला जात असताना आपल्या पैकीच असलेले मात्र भटके म्हणून ओळखले जाणारे समाजबांधव हा आनंद साजरा करू शकत नाही. अनेक अडीअडचणी आणि समस्यांसह जीवन जगत असलेल्या या भटक्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांनाही एक नागरिक म्हणून सर्व अधिकार मिळावे व सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगता यावे, यासाठी भटके विमुक्त परिषद धडपडत आहे. हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण असलेल्या दिवाळी या सणाच्या निमित्ताने भटक्यांच्या वस्त्यांमध्ये आनंद पसरावा म्हणून आज मंगळवारला भटके विमुक्त परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्यावतीने भटक्यांच्या वस्तीत जाऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या कतारी समाजाच्या वस्तीत जाऊन भटक्या बांधवांना ओवाळण्यात आले व भेटवस्तू देण्यात आले. याचवेळी बिऱ्हाडातील महिलांनाही भेटवस्तू देण्यात आले. फराळ करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी सुंदरलाल अंकूशे या भटक्या बांधवाने मनोगत व्यक्त करताना अशा उपक्रमांमुळे आम्ही समाजात सन्मानाने जगू शकत असल्याचे सांगितले. यामुळे आम्हाला आमचे हक्क व अधिकारी मिळू लागले असून शिक्षणापासून ते सर्वच क्षेत्रात पूढे येण्याची संधी मिळत असल्याचे सांगून असेच सोबत रहा, असा आग्रह त्यांनी केला. यावेळी नगर संघचालक अनिल मेहर व व्यापारी सतराम कौराणी यांना भटक्या समाजातील महिलांनी ओवाळले. कतारी समाज बांधवांसोबत भाऊबीज साजरी केल्यानंतर कारधा येथील मांग, गारुडी लोकांसोबतही संध्याकाळी साजरा करण्यात आली. लाखांदूर व लाखनी तालुक्यातील भटक्यांच्या वस्तीत जाऊन कार्यक्रमात सहभाग घेतला. भटक्या बांधवांसाठी दिलेल्या भेटवस्तू समाजातील दानशूर मंडळींकडून घेण्यात आल्या होत्या. यावेळी जिल्हा संघचालक राम चाचेरे, विहिंप जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, जिल्हा सहकार्यवाह रामकृष्ण बिसने, जिल्हा प्रचार प्रमुख राजेंद्र दोनाडकर, विभाग प्रचारक राहूल चव्हाण, सुखराम कटरे, जिल्हा प्रचारक प्रशांत कावरे, पंकज देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक शिवशंकर नाकाडे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन शिवा कांबळी यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)