शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून उखडले वर्दळीच्या तुमसर-देव्हाडी रस्त्याचे कारपेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:52 IST

राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तुमसर-देव्हाडी रस्त्याचे गत तीन वर्षांपासून कारपेट उखडले आहे. मात्र संबंधीत विभागाचे अद्यापही लक्ष नाही तर तीन किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महाराष्ट्राची ग्वाही हवेतच दिसत आहे.

ठळक मुद्देतीन किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे । खड्डेमुक्त महाराष्ट्राची ग्वाही हवेतच

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तुमसर-देव्हाडी रस्त्याचे गत तीन वर्षांपासून कारपेट उखडले आहे. मात्र संबंधीत विभागाचे अद्यापही लक्ष नाही तर तीन किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महाराष्ट्राची ग्वाही हवेतच दिसत आहे.तुमसर ते देव्हाडी हा पाच किलोमीटरचा रस्ता तालुक्यात सर्वाधिक वर्दळीचा आहे. राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जातो. तसेच तुमसर रोड रेल्वे स्थानकावर जाणारा हा एकमेव रस्ता आहे. दरदिवशी सुमारे २५ ते ३० हजार नागरिक या रस्त्यावरून मार्गक्रमन करतात. रहदारीच्या रस्त्यावरील कारपेट गत तीन वर्षांपासून उखडले आहे. दीड किलोमीटर रस्त्याचे कारपेट निघाले आहे. उर्वरित रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. केवळ एक किलोमीटरचा रस्ता रहदारीयोग्य आहे. नाईलाजास्त या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.रेल्वे स्थानकाला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने रात्री या मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडतो. गोबरवाही-तुमसर-देव्हाडी हा रस्ता नव्याने दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात येथे कामाला विलंब होत असून किमान कारपेटची दुरूस्ती करण्याची मागणी काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.खड्डे मुक्त महाराष्ट्राची ग्वाही शासन देत आहे. परंतु भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. जिल्हा आणि राज्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची कायम भीती असते. पावसाळापुर्वी या रस्त्यांची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. परंतु संबंधीत विभाग या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे अपघात घडत आहेत. वाहन चालकांना मनक्याचे आजार जळत आहे. संबंधित विभागाने रस्त्यांची दुरूस्ती केली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक