शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गांज्याची तस्करी अन्‌ तरुणाईला व्यसनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

भंडारा : कुठलेही व्यसन शरीरासाठी घातक आहे. ही बाब समजूनही दुर्लक्ष करून व्यसनाकडे आकर्षित होणाऱ्या तरुणाईला तारण्याची गरज ...

भंडारा : कुठलेही व्यसन शरीरासाठी घातक आहे. ही बाब समजूनही दुर्लक्ष करून व्यसनाकडे आकर्षित होणाऱ्या तरुणाईला तारण्याची गरज आहे. भंडारा जिल्ह्यात गुटखा, सुगंधित सुपारी याची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून, आता गांजाच्या तस्करीतून तरुणाईला व्यसनाचा विळखा घातला आहे. २६ जून रोजी दरवर्षी जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात व्यसनाच्या आहारी जाणाऱ्यांचे समुपदेशन करणे नितांत गरजेचे आहे. किंबहुना ही प्रक्रिया सातत्याने राबविणे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील व्यसनाबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यात ग्रामीण क्षेत्रात व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जिल्ह्यात महिलांचे प्रमाण व्यसनांमध्ये २० टक्के सहभाग आहे. त्यातच जिल्ह्यातील ६०.७ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करीत असल्याचेही वास्तव सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

तंबाखू सहज उपलब्ध होणारा नशेचा प्रकार आहे. विडी आणि सिगारेटच्या माध्यमातून तंबाखूचे सेवन केले जाते. एकदा लागलेले तंबाखू व अमली पदार्थाचे सेवन सहसा सुटत नाही. सुटत असले तरी मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची व मनावर संयमाची गरज सते.

भंडारा जिल्ह्यातील ६० टक्के पुरुष आणि २० टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. या आशयाची बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आली होती. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तंबाखूचे सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे. प्राचीन काळापासूनच तंबाखूचे सेवन केले जाते.

निकाटीआना टॅबकम असे तंबाखू चे शास्त्रीय नाव आहे. अल्कलाइड या गटात मोडणारे निकोटिन हे द्रव्य तंबाखूच्या मुळामध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपट्यातील जवळपास ६४ टक्के

निकोटिन पानांमध्ये असते. त्यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. जिल्हा ग्रामीण बहुल जिल्हा आहे.

तंबाखूचे सेवन करण्याची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. पंधरा वर्षांवरील पुरुषांचे प्रमाण ६० टक्के, तर याच वयोगटातील महिलांचे प्रमाण १९.७ टक्के आहे. विशेष म्हणजे आता तंबाखूचे सेवनासोबत गांजाचे सेवनही वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरुणांमध्ये खर्रा खाण्याचे प्रमाण अधिक असले तरी आता त्यांचे लक्ष गांजाच्या सेवनाकडे जात आहे. ही तेवढीच गांभीर्य आणि विचारात टाकणारी बाब आहे.

बॉक्स

तंबाखूमुक्त अभियान राबविण्याची गरज

भंडारा जिल्ह्यात विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले होते.

मात्र गत वर्षभरापासून शाळा बंद आहे. अशावेळी हे अभियान प्रभावीपणे राबविले गेले नाही.

आता ग्रामीण भागासह शहरी भागातील मुले ही गुटखा व गांजाच्या सेवनाकडे वळल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे सदर अभियान पुन्हा एकदा जोमाने राबविण्याची गरज आहे. त्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा

प्रभावीपणे राबवावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कोट बॉक्स

व्यसन हे जन्मजात लागत नाही, मात्र संगतीचा परिणाम आणि परिस्थिती त्याकडे नेते. बालके वयात आल्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन लाभणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाही तर त्यांची पावले संगतीमुळे व्यसनाकडे वळत असते. जिल्ह्यात गांजा कुठून व कसा येतो, याबाबतही पोलीस प्रशासनाने गांभीर्याने तपास करून त्याचा मूळ नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच आपली येणारी भविष्यकालीन पिढी व्यसनमुक्त तथा सुसंस्कृत होऊ शकेल.

-डमदेव कहालकर, महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्कार प्राप्त, खराशी, ता. लाखनी