नगरपंचायत निवडणूक : मतांचा जोगवा चंदन मोटघरे लाखनी लाखनी नगरपंचायत निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. प्रत्नयेक उमेदवार आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न करीत आहे. मतदारांना प्रलोभन देऊन मतदान पदरात पाडता येईल का याचा विचार करीत आहे. नवरात्र संपल्यामुळे मांसाहारी खवैय्याची चंगळ आहे. मटण पार्ट्यांना प्रारंभ झाला आहे. प्रत्येक प्रभागात तिहेरी लढत आहे. जातीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. ७ ओबीसीसाठी राखीव आहे. प्रभाग क्र. ७ मध्ये ५९३ मतदार आहेत. यात पुरुष म तदार ३०२ व स्त्री मतदार २९१ आहेत. प्रभाग क्र. ७ मध्ये काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपा अशी चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्र. ८ सर्वसाधारण गटासाठी आहे. प्रभाग ८ मध्ये ८२० मतदार आहेत. यात पुरुष मतदार ३९४ व स्त्री मतदार ४२६ आहेत. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिहेरी लढत आहे. प्रभाग ९ ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. तिरंगी लढत असून मतदार संख्या ५२७ आहे. यात महिला मतदार २५९ व पुरुष मतदार २६९ आहेत. प्रभाग क्र. ११ सर्वसाधारण गटासाठी आहे. यात मतदार संख्या ६३६ आहे. स्त्री मतदार ३२५ व पुरुष मतदार ३११ आहेत. लाखनीच्या राजकारणातील दिग्गज प्रभाग १० मधून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्र. १० अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मतदार संख्या ६८० आहे. यात पुरुष मतदार ३२८ व महिला मतदार ३५२ आहे. प्रभाग क्र. १२ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. यात ६ म हिला निवडणूक मैदानात तरी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्र. १३ सर्वसाधारण गटासाठी आहे. मतदार संख्या ५२६ आहेत. पुरुष मतदार २७० व स्त्री मतदार २५६ आहेत. काँग्रेस व भाजपा अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. प्रभाग क्र. १४ अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. तीन उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंख्या ४७१ आहे. पुरुष मतदार २३४ व स्त्री मतदार २३७ आहेत. प्रभाग क्र. १५ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. तिहेी लढत होणार असून मतदार संख्या ६२० आहे. यात पुरुष मतदार ३०५ व महिला मतदार ३१५ आहेत. प्रभाग क्र. १६ अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे. मतदार संख्या ५१८ आहे. यात पुरुष मतदार २६० व स्त्री मतदार २५८ आहेत. प्रभाग क्र. १७ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. दुहेरी लढत होण्याची चिन्हे आहेत. मतदार संख्या ५६१ आहे. यात स्त्री मतदार २७६ व पुरुष मतदार २८५ आहेत.नगरपंचायत निवडणुकात लाखनी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत गाजविल्यानंतर नगरसेवक बनून नगरपंचायत गाजविण्याची इच्छा आहे. काही उमेदवारांचे विकास कामावर भर देवून ठेकेदार कशी मिळेल याकडे लक्ष आहे. सामाजिक कार्ये, परिसराची स्वच्छता व वंचितांचा आधार हे मुद्दे निवडणुकीत दिसत नाही. लाखनी नगरपंचायतमध्ये ९ महिला व ८ पुरुष सदस्य राहणार आहेत. नगरपंचायत अध्यक्षपदाचे रोस्टर निघाले नाही. सर्व उमेदवार नगरसेवकाची खुर्ची कशी मिळेल याकरिता रात्रीचा दिवस करून प्रयत्न करीत आहेत.
मतदारांना खुश करण्यात उमेदवारांचा भर
By admin | Updated: October 26, 2015 01:02 IST