शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात कर्करोगाने ८९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 00:31 IST

कर्करोग आजारासंबंधी नाव उच्चारले तरी अंगावर शहारे येतात. कर्करोग आजारासंबंधी जनजागृती होत असली तरी भंडारा जिल्ह्यात गत तीन वर्षामध्ये या आजाराने ...

आज जागतिक कर्करोग दिन : जिल्ह्यात ३८३ रुग्ण बाधितदेवानंद नंदेश्वर भंडाराकर्करोग आजारासंबंधी नाव उच्चारले तरी अंगावर शहारे येतात. कर्करोग आजारासंबंधी जनजागृती होत असली तरी भंडारा जिल्ह्यात गत तीन वर्षामध्ये या आजाराने ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्ये ४४ पुरुष तर ४५ महिलांचा समावेश आहे. तीन वर्षामध्ये ३८३ रुग्ण कर्करोगाने बाधीत असल्याचे उघडकीस आले. दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कर्करोगाविषयी अजूनही बऱ्याच गैरसमजूती आहेत. त्यामुळे कर्करोगासंबंधी जनजागृती कार्यक्रमात अडचणी येत असतात. आरोग्यदायी वर्तणूक, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास आरोग्य संस्थेत जाऊन निदान करून घेणे याविषयी जनमानसात जागरुकता दिसत नाही. आरोग्यदायी आहार, शारीरिक व्यायाम, काम व योग्य वजन राखल्यास १/३ कर्करोगापासून दूर राहता येऊ शकते. जगातील २० ते ४० टक्के किशोरवयीन लठ्ठपणाने ग्रासले आहेत. जास्त वजन व लठ्ठपणा यामुळे आतडे, स्तन, गर्भाशय, बीज कोष, स्वादुपिंड, अन्ननलिका, किडनी, पित्ताशय या अवयवांच्या कर्करोगाचा धोका वाढल्याचे अभ्यासाअंती लक्षात आले आहे. मद्यपानामुळे विविध कर्करोग होण्याची शक्यता वाढते. भंडारा जिल्ह्यातील तीन वर्षातील कर्करोग तपासणी अहवाल लक्षात घेतला असता १ हजार ५५६ रुग्णांची कर्करोग आजाराची तपासणी करण्यात आली आहे. यात ६१ रुग्णांना गर्भाशयाचा कर्करोग, ९५ जणांना स्तनाचा कर्करोग आहे. स्तनाच्या कर्करोगात ९४ महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. ८४ रुग्णांना तोंडाचा कर्करोग आहे. यात ५७ पुरुष तर २७ महिलांचा समावेश आहे. इतर कर्करोगामध्ये १६३ रुग्णांना आजार बळावला आहे. यात ११९ पुरुष व ४४ महिलांचा समावेश आहे. एकुण ३८३ कर्करोगाचे रुग्ण आढळले असून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आजारावर आळा घालण्यासाठी जनजागरण तसेच निदान व उपचाराचे काम केले जात आहे. कर्करोग रुग्णांच्या निदानासाठी भंडारा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर व साकोली तसेच ग्रामीण रुग्णालय पवनी व लाखांदूर येथे कर्करोग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये १४० संशयित कर्करोग रुग्ण शोधून काढण्यात आलेले आहेत.या रुग्णांच्या जिल्हा रुग्णालयात तपासणी करून त्यातून ६९ कर्करोगाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी ३२ रुग्णांची किमोथेरेपीसाठी निवड करण्यात आलेली आहे. उर्वरीत सर्व रुग्णांना रेडीओथेरेपीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालय नागपूर येथे संदर्भीय करण्यात आलेले आहे. स्तन कर्करोगाची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय भंडारा येथे केली जात असून मागील तीन वर्षात ८ शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.