शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रानडुक्कर, रोहीचे संरक्षण रद्द करा

By admin | Updated: August 4, 2014 23:35 IST

पूर्व विदर्भात शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुक्कर आणि रोही, निलगाय उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांना केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अंतर्गत असलेल्या सुची

भंडारा : पूर्व विदर्भात शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुक्कर आणि रोही, निलगाय उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांना केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अंतर्गत असलेल्या सुची क्रमांक ३ मध्ये संरक्षण देण्यात आले आहे. सदर संरक्षण रद्द करून सुची क्रमांक ५ मध्ये समावेश करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्यांना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीराम दादा टिचकुले यांनी दिले आहे. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ४४० गावातील ११ हजार ३०६ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या यावर आहेत. या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात होणारे नुकसान थांबविले जाऊ शकते.पुर्व विदर्भातील धान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रानडुक्कर आणि रोही या प्राण्यांचा शेतीसाठी प्रचंड उपद्रव आहे. शेतात उभ्या पिकाची या दोन्ही वन्य प्राण्यांकडून प्रचंड नासाडी केली जाते. पिकांचे डोळ्यादेखत नुकसान होत असतानाही या प्राण्यांना मारण्याची परवानगी शेकऱ्याला नाही. परिणामी नुकसान सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातील ४० टक्के क्षेत्र झुडपी जंगलाने व्याप्त आहे. रानडुक्कर आणि रोही दिवसभर झुडपी जंगल आणि शेतात लपून राहतात व रात्रीच्या वेळी समुहाने येवून शेतपिकाचे नुकसान करतात.केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या क्रमांक १ च्या सुचीमध्ये समाविष्ट असलेल्या बिबट, चित्ता, वाघ, सिंह या प्राण्यांचे खाद्य म्हणून रानडुक्कर आणि रोही यांचा समावेश सुची क्रमांक ३ मध्ये असल्याने या प्राण्यांची विनापरवानगी शिकार करता येत नाही. हा अधिनियम लागू झाल्यापासून ४० वर्षानंतर वाघ, सिंह यांच्या प्रजनाचे कमी झालेले प्रमाण आणि वाढलेली अवैध शिकार यामुळे या प्राण्यांची संख्या नगण्य झाली आहे. जेव्हा की, रानडुक्कर व रोही यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. शासनाकडून वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आलेले नाहीत. जंगलामध्ये या प्राण्यांना पुरेशा प्रमाणात खाद्य न मिळाल्याने प्राण्यांनी गावाच्या आणि शेतीच्या दिशेने वाटचाल करणे सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यादेखत नुकसान पहावे लागत आहे. शासनाकडून परवानगी घेवून या प्राण्यांना मारण्याची सोय आहे. मात्र परवानगी घेताना असलेल्या अटी यामुळे याचा कुणीही लाभ घेत नाही. नुकसानीनंतर शासनाकडून मिळणारी भरपाईसुद्धा होणाऱ्या नुकसानीचा दहा टक्केच असते. अशा परिस्थितीत सुची क्रमांक ३ मध्ये असलेले संरक्षण रद्द करून सुची क्रमांक ५ मध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दादा टिचकुले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)