शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा आदेश रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:34 IST

भंडारा : मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ सातत्याने आंदोलन करत आहे. ...

भंडारा : मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ सातत्याने आंदोलन करत आहे. या आंदोलनामुळे मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन सरकारतर्फे संघटनेला देण्यात आले होते. मात्र, शासनाच्या १८ फेब्रुवारी २०२१च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीयांच्या हक्काच्या ३३ टक्के रिक्त पदांवर अमागासवर्गीयांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा हा आदेश रद्द करावा, अशी मागणी कामगार नेते डॉ. विनोद भोयर यांनी केली आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षणच संपुष्टात आले आहे. मागासवर्गीयांवर हा मोठा अन्याय आहे तसेच हा निर्णय मागासवर्गीयांचे संवैधानिक हक्क डावलणारा असल्यामुळे मागासवर्गीयांमध्ये सरकारविषयी प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा १८ फेब्रुवारी २०२१चा शासन आदेश तत्काळ रद्द करून ३३ टक्के कोट्यातील रिक्त पदे बिंदुनामावलीनुसार व खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीची सर्व पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात सुधारित आदेश शासनाने जारी करावेत. तसेच एक महिन्याच्या आत मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण लागू करावे व जवळपास साडेतीन वर्षांपासून बंद असलेले मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम करावे, पदोन्नतीपासून वंचित असलेल्या जवळपास ७० हजार मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शासनाकडे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद भोयर यांनी केली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असून, शासनाने यासंदर्भात पावले न उचलल्यास कास्ट्राईब कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे ब्रहमपाल चौरे, अमरदीप बोरकर ॲड. बी. जी. दामले, अचल दामले, एस. डब्ल्यू. राखडे आदींनी दिले.