शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

शिवतीर्थावरील शिबिर ही ज्ञानसमृद्धीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:10 IST

माणस मुळातच दुबळा नसतो. त्या प्रसंगानुरूप दुबळा बनतो. त्यासाठी त्यांना सुसंस्करित विकासाभीमुख गुणवत्ताचे शिक्षण देणे व घेणे गजरेचे आहे आणि ते या महाशिवरात्रीनिमित्त येथे लावलेल्या सर्व विभागाच्या कामातून मिळेल.

ठळक मुद्देसंजय देशमुख : झिरी, नांदोरा येथील महाशिवरात्रीनिमित्त शिबिरात मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : माणस मुळातच दुबळा नसतो. त्या प्रसंगानुरूप दुबळा बनतो. त्यासाठी त्यांना सुसंस्करित विकासाभीमुख गुणवत्ताचे शिक्षण देणे व घेणे गजरेचे आहे आणि ते या महाशिवरात्रीनिमित्त येथे लावलेल्या सर्व विभागाच्या कामातून मिळेल. चुकतो हे कळत नाही पण चुका म्हणजे उरलेले धन आहे. मनुष्य शब्दविर नसावा, कृती विर असावा, याकरिता शिवतीर्थावरील ज्ञान समृद्धीरूपी बागेतून विचाराचे धन घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, शासकीय कार्यालय व झिरी देवस्थान पंचकमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख बोलत होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक विनिता शाहु, सहायक समाजकल्याण आयुक्त आशा कवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, प्रभारी सहायक कामगार आयुक्त उ.सु. लोया, सामान्य रुग्णालयाचे डॉ. जैयस्वाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.पी. नायगांवकर उपस्थित होते. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचे भौगोलिक, सामाजिक समस्या वेगवेगळ्या आहेत. इतर जिल्ह्यापेक्षा भंडारा जिल्ह्याच्या मागण्या वेगळ्या आहेत. नैसर्गीक संपन्न मात्र मागासलेपणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याला दूर सारण्यासाठी शाषवत समतोल विकासानुसार प्रयत्न करावे. दरडोई उत्पन्न सोबत सामाजिक विकास हा उद्देश पुढे ठेऊन सर्व भाविक भक्तांनी झिरी येथील सर्व विभागाची माहिती घ्यावी, असे उद्घाटकीय भाषणात जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले. पोलीस अधीक्षक विनिता शाहु यांनी, जिल्ह्यात तरूणाईवरील गुन्हाचे प्रमाण जास्त आहे. मुला-मुलींना कायद्याची जान असावी. याकरिता पोलिसाचे सहकार्य घ्यावे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फिरते पोलीस स्टेशन व जनजागृती रथाचा लाभ घ्यावा पोलिसाला मित्र समजावे याप्रसंगी जिल्हा विविध सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सामान्य रुग्णालय समाजकल्याण कार्यालय व महामंडळे, सामाजिक न्याय भवन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कामगार आयुक्त कार्यालय, महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, उप वनसंरक्षक कार्यालय, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, रोजगार हमी विभाग, पंचायत समिती, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, महिला बाल कल्याण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, माहिती अधिकारी कार्यालयाचे योजना विषयी स्टॉल लावण्यात आले होते. याप्रसंगी भाविक भक्तांनी या ज्ञानरूपी विकास बागेला भेट देण्यात आले. प्रास्ताविक व संचालन दिवानी न्यायाधीश रासजे भट्टाचार्य यांनी केले.