शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरार्थ्यांनी संतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे

By admin | Updated: January 14, 2016 00:47 IST

राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणाऱ्या शिबिरार्थ्यांनी काम करताना संताचे विचार जोपासावे व जनसेवा ही ईश्वरसेवा समजून ग्रामीण भागात काम करावे,

रासेयो शिबिर : विनायक बुरडे यांचे प्रतिपादनखराशी : राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणाऱ्या शिबिरार्थ्यांनी काम करताना संताचे विचार जोपासावे व जनसेवा ही ईश्वरसेवा समजून ग्रामीण भागात काम करावे, असे आवाहन येथील बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी केले. ते जेवनाळा येथे संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर यांच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय रासेयो शिबिरात बोलत होते.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृंदा करंजेकर, लाखनी पंचायत समितीचे उपसभापती विजय कापसे, सरपंच वैशाली बुरडे, उपसरपंच दिलीप घटके, पालकृष्ण उपरीकर, पोलीस पाटील विना सेलोकर, वाय.एस. टिचकुले, रमेश लुटे, संतोष गिऱ्हेपुंजे, वनिता सेलोकर, मुख्याध्यापक निर्वाण, अनिल गोंदोळे, डॉ. राजेंद्र खंडाईत, प्रा. निंबेकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्या डॉ. करंजेकर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याच्या हातात देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांने आदर्श जीवन जगावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उपयोग करावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यांच्या कार्याचे परीक्षण करून त्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनेक शिबिरार्थी व गावकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यासपीठावरून व्यक्त केल्या.विद्यापीठस्तरीय शिबिराच्या समारोपाप्रसंगी जेवनाळा येथील ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजयकुमार निंबेकर यांनी सुत्रसंचालन सुधन्वा चेटुले तर आभार डॉ. राजेंद्र खंडाईत यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. रवी पाठेकर, प्रा. शेंडे, प्रा. नितीन थुल, प्रा. रमेश बागडे, प्रा. गिरीश लांजेवार, बाळकृष्ण मेश्राम यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)