शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रवासी निवारा परिसरात लागले कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:44 IST

येथील प्रवासी निवारा येथे काही वर्षाआधी तंटामुक्त समितीतर्फे ३२ हजार खर्च करून येथे चार कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे बस प्रवासी निवारामध्ये प्रत्येक प्रवाशांना सुरक्षा वाटायची.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा पुढाकार : देखरेख करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीवर

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : येथील प्रवासी निवारा येथे काही वर्षाआधी तंटामुक्त समितीतर्फे ३२ हजार खर्च करून येथे चार कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे बस प्रवासी निवारामध्ये प्रत्येक प्रवाशांना सुरक्षा वाटायची. परंतु लागलेले कॅमेरे जास्त काळ टिकू शकले नाही. कालांतराने अतिक्रमण हटाव मोहिमेत बंद कॅमेरेही हटावण्यात आले होते आणि तेव्हापासून बेपत्ता झालेले कॅमेरे याविषयीचे ‘लोकमत’ने वेळोवेळी वचा फोडली. याची दखल घेत प्रवासी निवारा अड्याळ येथे ग्रामपंचायतच्या पुढाकारातून कॅमेरे लावण्यात आले. यामुळे ग्रामस्थ तथा प्रवाशांनी ग्रामपंचायतचे आभार माणले.अड्याळ प्रवासी निवारामध्ये रोज सकाळ सायंकाळ शाळेच्या वेळेवर जिकडे तिकडे विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतु या दोन्ही वेळेला इथे एकही वाहतुक नियंत्रक नसल्यामुळे वाटेल तिथे मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थी, प्रवासी, वाहने उभे असतात परंतु यामुळे धोका कधीही होऊ शकतो परंतु याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते आणि जेव्हा एखादी घटना घडली की मग अचानकपणे पोलिसांचा ताफा दिसून येतो.याला म्हणायचे तरी काय, तहाण लागल्यावर विहिर खोदण्याचे शहापणपण योग्य राहिल का की त्याआधीच प्रयत्न महत्वाचे आहे, हा एक प्रश्नच आहे.सीसीटीव्ही कॅमेरे उपयोगाचे कुणाचे, हाही एक प्रश्नच आहे. लावलेल्या कॅमेरा यंत्राचे वेळोवेळी देखभाल तसेच याची मुख्य यंत्रणा सध्या ग्रामपंचायतमध्ये आहे परंतु ही यंत्रणा पोलीस स्टेशन अड्याळ कार्यालयातच ठेवावी तसेच यानंतर पोलीस प्रशासनाने या यंत्रणाची जबाबदारी देखभाल करावी, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. परंतु याला भंडारा पोलीस अधिक्षक मान्यता देणार की नाही अशीही चर्चा सध्या गावात रंगत आहे.सीसीटीव्ही कॅमेरामुळे सर्वात जास्त मदत ग्रामस्थांना तर होईलच परंतु त्याहीपेक्षा पोलीस प्रशासनाला होऊ शकते. मागील अनेक वर्षापासून कॅमेरे बंद घरात कैद होते. आणि त्यांना पुन्हा कार्यान्वीत करण्याचे काम येथील ग्रामपंचायत कार्यालयाने केले आहे. यासाठी पुन्हा पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रत्येकी एक एक कॅमेरा दिला तर प्रवासी निवारामध्ये पुन्हा सुरक्षेत भर पडू शकते.अड्याळ बस प्रवासी निवारा मधील खड्डे बुजले आणि कॅमेरे लावण्यात आले परंतु आजही मोठा प्रकाश देणारे पथदिवे लागले नाही. याहीमुळे इथे अंधारातच प्रकाश दिसतो. बस प्रवासी निवारा येथे सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थी घराला जाण्यास बेकाबु दिसतात त्यामुळेच की काय बस आल्यानंतर संपूर्ण विद्यार्थी धाव घेतात यामुळे मोठा अपघात कधीही याठिकाणी होवू शकतो. याची शक्यताही नाकारता येत नाही. लागलेले कॅमेरे आपला काम करतीलच परंतु अपघात होणार नाही यासाठी याठिकाणी कुणाची आणि कशाची आवश्यकता आहे याची खबरदारी घेणार कोण, हा एक मोठा प्रश्न आहे.बसप्रवासी निवारामध्ये विद्यार्थ्यांची मदत करणार कोण याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहेत.याविषयीची माहिती गावातील शाळा, कॉन्व्हेंट व पोलीस स्टेशनला दिली आहे. चक्क प्रकाश देणारे स्ट्रीट लाईट लवकरच लावण्यात येईल, अशी माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळाली.-जयश्री कुंभलकर,सरपंच अड्याळ.