शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:57 IST

तालुक्यातील कोष्टी येथील अल्पभूधारक शेतकरी सेवकराम परसराम पंचबुध्दे (४६) यांनी सततच्या नापीकीला कंटाळत, कर्जापायी स्वत:च्या शेतावर कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी कोष्टी येथे घडली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील कोष्टी येथील अल्पभूधारक शेतकरी सेवकराम परसराम पंचबुध्दे (४६) यांनी सततच्या नापीकीला कंटाळत, कर्जापायी स्वत:च्या शेतावर कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी कोष्टी येथे घडली होती. सदर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या देव्हाडा येथील साखर कारखाना प्रशासनाने तात्काळ त्या मृतकांच्या कुंटुबियांना १५ लक्ष रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मृतक शेतकरी सेवकराम पंचबुध्दे यांनी आपल्या शेतातील अर्धा एकराचा ऊस माणस अँग्रो साखर कारखाना युनिट क्रमांक चारला विकला होता.परंतू सदर ऊस हा कारखान्यात मृतकाच्या नावावर न चढवता त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर चढवून एक प्रकारे फसवणूक करीत त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप मृतकांच्या कुंटुबियांना केला.मृतक शेतकºयाने देव्हाडा माणस साखर कारखाना प्रशासनाला विकलेल्या ऊसाचा चुकारा हा वेळेवर मिळत नव्हता. सदर मोबदल्याविषयी वारंवार मागणी करूनही कारखाना प्रशासनाने मोबदला दिला नाही. त्यामुळे त्या शेतकºयाचे मानसिक संतुलन बिघडले. आता ऊसाचा मोबदला मिळणार नाही, कुटुबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, मुलांचे शिक्षण, पुर्वीच्या कर्जाची परतफेड कशी करायची, मुलींच्या लग्नाची चिंता या आर्थिक विवंचनेत तो सापडला होता. त्यामुळे त्यांनी नैराशाच्या खाईत लोटत आपल्या शेतावरील कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून स्वत:ची जिवनयात्रा संपवली.त्यांच्या आत्महत्यामुळे कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. मृतकाला माणस अँग्रो साखर कारखाना व्यवस्थापनाकडून वेळेवर ऊसाच्या चुकारा मिळाला असता तर त्याने मृत्युला कवटाळले नसते, त्यामुळे त्या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मृत्युस देव्हाडा येथील साखर कारखाना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने केला आहे. त्यामूळे त्या आत्महत्याग्रस्त कुटूबियांना तात्काळ १५ लक्ष रूपयांचे आर्थिक मदत देण्याची मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विश्वास बडवाईक, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बालपांडे, कैलाश तितीरमारे, विक्रम कांबळे, प्रकाश नगरधने, अजय गौपाले, जितु सार्वे, कालीदास वनवे, आत्महत्याग्रस्त शेतकºयाची पत्नी, कुटुंब आदींनी जिल्हाधिकारी, तसेच कारखाना व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली.मागणीची पुर्ततान झाल्यास देव्हाडा साखर कारखानासमोर आत्महत्याग्रस्त कुटूबियांसमवेत जनआंदोलन करण्याचा ईशारा निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड