मत्स्य विकासाला चालना : विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते उद्घाटनभंडारा : विदर्भात गोड्यापाण्याच्या जलसाठ्यांची उपलब्धता आहे. या जलसाठ्याचा उपयोग मत्स्यपालन विकासाचा केंद्रबिंदू ठेवून अॅडव्हॉटेज विदर्भाला चालना देता येईल. मत्स्य सहकारी संस्थांनी उद्योजक होऊन स्वंयनिर्भर व्हावे, असे आवाहन नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्यसाठी गोसेखुर्द जलाशयात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन या प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, अतिरिक्त आयुक्त संजयसिंह गौतम, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, सहायक आयुक्त राजलक्ष्मी शहा, अॅडव्हांस अॅग्रोटेकचे संजयसिंह उरकुंदे, गोसेखुर्दचे कार्यकारी अभियंता रमेश वर्धने, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपविभागीय अधिकारी सुधाकर कुळमेथे, जि.प.सदस्या हंसा खोब्रागडे, प्रकल्प संचालक जेजूरकर उपस्थित होते.यावेळी अनुपकुमार म्हणाले, पारंपरिक मत्स्य व्यवसायापेक्षा वैज्ञानिक दृष्टी ठेवून मत्स्य व्यवसायाच्या आधुनिक पद्धतीचा स्वीकार करायला हवा. पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन हा प्रायोगिक प्रकल्प दीर्घ काळपर्यंत फायदा देणारा प्रकल्प आहे. मत्स्य विकास महामंडळाच्या जेवढ्या योजना आहेत त्यासर्व या योजना जिल्ह्यासाठी राबविण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. मत्स्य सहकारी संस्थांनी मत्स्यपालन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावे. अडव्हांस अॅग्रोटेकचे उरकुंदे यांनी पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन कसे करावे यावर मार्गदर्शन केले. या पिंजऱ्यामध्ये रोहू कतला, मिरगल, ग्रासकार्प, कॉमन कार्प सिल्व्हर, चितळ, पंगासी, तलापीया या प्रजातीच्याम माशांची निर्मिती होवू शकते, अशी माहिती उरकुंदे यांनी दिली. यावेळी मस्त्य सहकारी संस्थांचे सभासद उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गोसेखुर्दमध्ये मत्स्य पालनासाठी पिंजरे
By admin | Updated: June 12, 2014 23:47 IST