शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

भंडारा : कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त फटका हातावर पोट भरणारे विक्रेते, छोटे व्यावसायिक आणि मजुरांना बसला आहे. कोरोनाच्या ...

भंडारा : कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त फटका हातावर पोट भरणारे विक्रेते, छोटे व्यावसायिक आणि मजुरांना बसला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एसटी महामंडळाने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सलग चार महिने कोणताच व्यवसाय करता आला नाही. त्यामुळे अनेक अडचणी आल्याचे भंडारा बसस्थानकातील शेंगदाणे, चिक्की, बिस्कीट, पाणी बॉटल, खारेमुरे या खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एसटी महामंडळाने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक दिवस प्रवासी नसल्याने बसस्थानकातील विक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झाला होता. मात्र, आता सर्वच बसेस सुरू झाल्याने बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी आता पुन्हा रुळावर आली आहे. मात्र, असे असले तरी ग्रामीण भागातील काही बस सुरू नसल्याने अजूनही अपेक्षित व्यवसाय होत नाही. ग्रामीण बसफेऱ्या सुरु झाल्यास व्यवसायात भर पडेल, असेही विक्रेत्यांनी सांगितले.

बॉक्स

एसटीला द्यावे लागते वार्षिक १५ हजारचे शुल्क

बसस्थानकात विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी एसटी महामंडळाला जुन्या विक्रेत्यांना पंधरा हजार, तर नवीन विक्रेत्यांना दहा हजारांचे शुल्क भरावे लागते. मात्र, कोरोनामुळे हे शुल्क माफ करावे, अशी मागणी बळीराम तरारे, अभय मुळे, कार्तिक मुळे, विलास शेंडे, अरविंद दुर्गडे या विक्रेत्यांनी केली आहे. याशिवाय विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्रही जोडावे लागते. त्यामुळे व्यवसाय जास्त कसा होईल, याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे.

कोट

खरे ग्राहक ग्रामीण भागातीलच

बसस्थानकात विविध खाद्य पदार्थ विकत घेणारे ग्राहक खरे तर ग्रामीण भागातीलच जास्त प्रमाणात असतात. त्यातुलनेत शहरी ग्राहक कमी खरेदी करतात. त्यामुळे ग्रामीण बसफेऱ्या वाढल्यास आमचा व्यवसाय आणखी वाढेल.

कार्तिक मुळे, विक्रेता

कोट

मी ३५ वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. यापूर्वी कधी चारशे, तर कधी पाचशे रुपये रोजी मिळायची. परंतु आज जेमतेम पोटापाण्यापुरतेच चार पैसे मिळत आहेत. अशा संकटात आम्हाला शासनाने मदत करावी, अशी आमची मागणी आहे.

बळीराम तरारे, विक्रेता

कोट

कोरोनात आमचा धंदा चार महिने बंद होता. अशावेळी आमच्या मदतीला कुणीही आले नाही. त्यामुळे संसारासाठी असंख्य अडचणी आल्या. त्यामुळे एसटी महामंडळाने किमान दोन वर्ष तरी आम्हाला व्यवसाय शुल्क माफ करण्याची गरज आहे. शासनाने आमची ही मागणी मान्य करावी.

सुयश तरारे, विक्रेता