शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

बसची ट्रकला धडक - १३ प्रवासी जखमी

By admin | Updated: June 16, 2014 23:20 IST

शेळ्यांचा कळप रस्ता ओलांडताना नागपूर दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाने गती कमी केली असता, मागाहून येणाऱ्या बसने ट्रकला जोरदार धडक दिली. यात बस रस्त्याच्या खाली उतरली.

जवाहरनगर : शेळ्यांचा कळप रस्ता ओलांडताना नागपूर दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाने गती कमी केली असता, मागाहून येणाऱ्या बसने ट्रकला जोरदार धडक दिली. यात बस रस्त्याच्या खाली उतरली. बस चालकासह १३ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज सकाळी १०.३० वाजता सुमारास खरबी नाका राष्ट्रीय महामार्गावर घडली.अज्ञात ट्रक हा भंडाऱ्याहून नागपुरकडे जात होता. खरबी नाका येथील शेळ्यांचा कळप डावीकडून उजवीकडे बुद्ध विहार दिशेने सकाळी १०.३० वाजता सुमारास रस्ता ओलांडीत होता. अज्ञात ट्रक चालकाने ट्रकची गती कमी केली. त्या दरम्यान ट्रकच्या मागाहून येणाऱ्या भंडारा आगाराची २ बाय २ भंडारा-नागपूर निमआराम बस एमएच-०७/सी-९०९७ ने ट्रकला जोरदार धडक दिली. बसचा दर्शनी भागाचा चुराडा झाला. बसचालकाने समयसुचकता दाखवित उताराच्या दिशेने बस वळविली. ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळाहून पोबारा झाला. यात चालकासह तेरा प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मेंढे, शिपाई राऊत, घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. यात बसचालक राधेश्याम खडसे ३७ (भंडारा) प्रवासी, अनसूया भोयर (६५) रा.चकारा, उर्वरित प्रवासी राधेश्याम मेश्राम (५०) रा.कापसी (नागपूर), शलिम शेख (३९) रा.नागपूर, वसंता कावळे (५२) कापसी, संदीप उईके (३२) पारडी, सोनल खेडीकर (२८) लाखनी, योगेशकुमार रामसिंग (१७) न्यु दिल्ली, रोशनी गुप्ता (२०) भंडारा, लता गौर (५४) भंडारा या सर्वांवर प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली. भंडारा आगाराचे निरीक्षक रमेश गडेकर यांच्या फिर्यादीवरून अती वेगाने व हलगर्जीपणाने बस चालवित बसच्या आतील प्रवासीस जखमी होणार कारणीभूत ठरीत असलेल्या चालक राधेश्याम खडसे यांच्या विरूद्ध जवाहरनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.पुढील तपास पोलीस हवालदार नेवालचंद्र टिचकुले करीत आहे. (वार्ताहर)