शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धानपीक जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:51 IST

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : यावर्षी लाखांदूर तालुक्यात तुडतुडा किडीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपीक फस्त केले आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या चिचोली येथील दोन शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले.चिचोली येथील रामदास नैताम, शालीक समरीत, शीतल मेश्राम, अश्विन मोटघरे, रघुनाथ समरत, मंगेश समरीत यांच्यासह गावातील अन्य शेतकऱ्यांच्या धानपिकावर प्रादुर्भाव होऊन पीक फस्त झाले आहे.किडीमुळे यावर्षी ...

ठळक मुद्देचिचोली येथील प्रकार : नापिकीमुळे शेतकरी त्रस्त

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : यावर्षी लाखांदूर तालुक्यात तुडतुडा किडीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपीक फस्त केले आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या चिचोली येथील दोन शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले.चिचोली येथील रामदास नैताम, शालीक समरीत, शीतल मेश्राम, अश्विन मोटघरे, रघुनाथ समरत, मंगेश समरीत यांच्यासह गावातील अन्य शेतकऱ्यांच्या धानपिकावर प्रादुर्भाव होऊन पीक फस्त झाले आहे.किडीमुळे यावर्षी एक रूपयाचेही धान मिळणे कठीण झाल्यामुळे रामदास नैताम व शालीक समरीत यांनी बुधवारला शेतातील धानपिक जाळून टाकले. असे असताना कृषी विभाग शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी न करता टेबलावर सर्वेक्षण करून अहवाल पाठवित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना शेतकऱ्यांचे बळी गेले. कुठे तीव्र कीटकनाशकांच्या फवारणीमुळे जिवीतहानी तर कुठे फवारणीअभावी पीक हानी झाल्याचे वास्तव आहे. शेतकरी पिकांच्या संरक्षणार्थ विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहे मात्र पीक वाचविण्याच्या नादात त्याचाच मृत्यू झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. धान उत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे जीव जाईल या भीतीपोटी अनेकांनी फवारणी टाळली. फवारणी टाळल्याने अनेक भागात तुडतुडा या किडीसह अन्य किडीची लागण होऊन हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक नष्ट झाले आहे. धानपीकाच्या लोंबी भरल्या असताना किडीमुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला. उत्पादन खर्चावर आधारित धानाला दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहे. परिणामी कर्जबाजारी व नापिकीच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला असतानाही धान उत्पादक शेतकऱ्यांविषयी लोकप्रतिनिधी बोलण्यासाठी तयार नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.तुडतुडा या किडीमुळे हातात आलेले धानपिक नष्ट झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले आहे. प्रशासनाने आतातरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे यांनी केली आहे.