शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

सुरक्षेचे दंडुके पेलवणाऱ्या हातात स्वच्छतेसाठी झाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 22:09 IST

सुरक्षा व सुव्यवस्थाची जबाबदारी पोलिसांवर असते. हातात दंडुके व जबादारी दिलेल्या भागात शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस विभागाची दमछाक नेहमी पाहायला मिळते. कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी गावातील गुन्हेगारी साफ करणाऱ्या पोलिसांच्या हातात परिसर स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू दिसले.

ठळक मुद्देवरठी पोलिसांचा उपक्रम : पोलीस ठाणे परिसरासह रस्त्यावर स्वच्छता अभियान

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सुरक्षा व सुव्यवस्थाची जबाबदारी पोलिसांवर असते. हातात दंडुके व जबादारी दिलेल्या भागात शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस विभागाची दमछाक नेहमी पाहायला मिळते. कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी गावातील गुन्हेगारी साफ करणाऱ्या पोलिसांच्या हातात परिसर स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू दिसले. खाकी वर्दी दिसली की अनेकांना घाम फुटतो पण ही खाकी वर्दी स्वच्छता मोहीम राबवताना झळकली. गुन्हेगारी सफाई प्रमाणे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वरठी पोलिसांनी घेतलेले पुढाकार चर्चेचा तेवढाच आकर्षणाचा विषय आहे.वरठी येथील जगनाडे चौकातील जैन मंदिर परिसरात पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाणे भाड्याच्या घरात असून त्या समोरील भागात जागेची वाणवा आहे. पार्कींगची सोय नाही. पोलीस ठाणे समोरील भागात असलेल्या खुल्या जागेत घाण व कचरा पडून होता. वरठी-भंडारा मार्गावर असलेल्या पोलीस ठाणेला जाणाºया वळण मार्गावरील रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा आहे. त्या भागात कचरा वाढल्याने पोलीस ठाणेचे 'लुक' जनावरांच्या गोठ्यासारखे दिसत होते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण होते. परिसरात पसरलेली घाण व कचरा लक्षात घेऊन नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक एस.बी. ताजने यांनी स्वच्छता मोहीम हातात घेतली. पोलीस ठाणे समोरील जागेत सपाटीकरण करून व्यायाम व खेळण्यासाठी मैदान तयार केले. रस्त्याच्या कडेला उगवलेले कचरा व घाण स्वच्छ करण्यात आली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, हवालदार सचिन गभने, छाया मेश्राम, भारती टेकाम, राकेश बोरकर, कुंदन फुलबांधे, त्रिमूर्ती लांडगे, संदीप बनते व नंदकिशोर मारबते यांनी स्वत: हातात फावडे व झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. या भागात राहणारे पंचायत समिती माजी सदस्य रवी येळणे यांना माहिती मिळताच तेही हातात फावडा घेऊन सहभागी झाले. पोलीस ठाणे व रस्त्याच्या पलीकडचे संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आले.पोलिसांना कामाचा प्रचंड ताण असतो. २४ तास अलर्ट रहावे लागते. कधी कोणती घटना घडणार आणि कुठं धावत जावे लागणार याचा नेम नाही. यामुळे या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळ राखून स्वत: ला सज्ज ठेवावे लागते. आॅन ड्युटी त्यांना खूप कमी वेळ आरामासाठी मिळतो. वेळप्रसंगी येणाऱ्या आवाहनाला तयार ठेवण्यासाठी सवड मिळाल्यावर रिलॅक्स ठेवणे आवश्यक असते. अशा रिकाम्या वेळचा सदुपयोग पोलिसांनी स्वच्छता मोहिमेकरिता राखून ठेवला आहे. गत अनेक दिवसांपासून सवड मिळताच स्वच्छता मोहीम फत्ते करण्यावर भर देतात. पोलीस ठाण्यासमोरील अख्खे परिसर त्यांनी स्वत: स्वच्छ करून खेळण्याचे मैदान तयार केले. यासोबत मुख्य मार्गावर असलेले कचरा आणि घाण साफ करून लगतच्या भागात वृक्षारोपण करण्याचे मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना रस्त्यावर साफसफाई करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या तर बघ्याची गर्दी जमली होती. स्वच्छेतेचा हा आदर्श नुसते बघ्याच्या स्वरूपात पाहून गावात चर्चिल्या जाणार की यापासून बोध घेऊन प्रत्येकजण ही जबाबदारी म्हणून ही योजना अमलात आणेल हा यक्ष प्रश्न आहे. स्वच्छता हि एकाची नाही तर संपूर्ण गावातील नागरिकांची जबाबदारी आहे.