शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

By admin | Updated: June 30, 2017 00:30 IST

तुमसर शहरातील मुख्य बाजारपेठेत तथा परिसरात अवैध बांधकाम व अतिक्रमणावर तुमसर नगर परिषदेने गुरूवारी बुलडोजर चालविला.

बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास : महिला मुख्याधिकाऱ्यांनी सांभाळला मोर्चा, शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्पलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहरातील मुख्य बाजारपेठेत तथा परिसरात अवैध बांधकाम व अतिक्रमणावर तुमसर नगर परिषदेने गुरूवारी बुलडोजर चालविला. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. नव्याने रूजू झालेल्या महिला मुख्याधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळपासूनच मोर्चा सांभाळला होता. पोलीस बंदोबस्त याप्रसंगी चोख होता. शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढल्या जाणार आहे. अतिक्रमणाच्या कारवाई दरम्यान एक दोन नगरसेवक वगळता कुणीच फिरकले नाही.तुमसर शहरात मागील काही वर्षापासून अतिक्रमण तथा अवैध बांधकामात वाढ झाली आहे. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाने डोके वर काढले होते. आठवडी बाजाराच्या दिवशी नागरिकांना पायी सुद्धा चालता येत नाही. येथील रस्ते दिवसेंदिवस अरूंद होत चालले होते. तुमसर नगरपरिषदेसमोरील बुक डेपो चाळ, कपडा मार्केट, फळा बाजार, जूने गंग बाजार परिसरात गुरूवारी अतिक्रमणाचा बुलडोजर चालला. सकाळी ७.३० पासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. शहरातील सर्वच अतिक्रमण तथा अवैध बांधकामावर कारवाई करावी, असा सूर शहरात उमटत होते.मुख्याधिकारी अर्चना मेंढे, पोलीस निरीक्षक आर.आर. नागरे, नायब तहसीलदार एन.पी. गौंड तथा नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांनी सकाळी ६.३० वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात केली. एका जेसीबींनी अतिक्रमण काढायला सुरूवात केली. त्यानंतर दुसरी जेसीबी मागविण्यात आली. बुक डेपो परिसरातील अतिक्रमण काढतानी एका दुकानदाराशी शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी तात्काळ येथे दखल घेतली. फळ दुकानदार तथा इतर दुकानदारांनी दुकानासमोरील अतिक्रमण स्वत: काढले. मुख्य बाजारपेठेत रस्ते अरूंद झाले होते. अतिक्रमणानंतर येथे तात्काळ खड्डे पडलेल्या ठिकाणी बांधकाम करण्याची मागणी दुकानदारांनी केली.शहरातील प्रमुख मार्गावर वाहतुकीस अडथडा ठरणाऱ्या अतिक्रमण तथा अवैध बांधकाम पाडण्याचे संकेत मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी दिली. अतिक्रमणाची कारवाई पाहण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मुख्याधिकाऱ्यांनी येथे काही दिवसापूर्वी व्यावसायीकांची बैठक बोलाविली होती. त्यात अतिक्रमण तथा अवैध बांधकाम हटविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने गुरूवारी प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.