शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांवर चालला बुलडोजर; साहित्य घेतले ताब्यात

By युवराज गोमास | Updated: February 13, 2024 14:39 IST

नगरपालिका, वाहतूक विभागाची कारवाई

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी व अपघात रोखण्याचा उपाय म्हणून १३ फेब्रुवारी रोजी दुपारपासून भंडारा शहरातील ऑफीस क्लब ते नागपूर नाकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ करण्यात आला. अतिक्रमणांवर बुलडोजर चालविण्यात आला. तसेच अतिक्रमणे न काढणाऱ्यांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई भंडारा नगरपालिका, महामार्ग वाहतूक पोलिस व जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आली.

सहा महिन्यापूर्वी भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले अतिक्रमणे तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. परंतु, दुसऱ्यादिवशी पुन्हा अतिक्रमणे 'जैसे थे' झाले होते. परिणामी वाहतुकीला अडथळा येवून सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती. अनेकांना वाहतुकदारांना अपघातांना सामोरे जावे लागत होते. महामार्गाच्या अगदी कडेला चहा टपरी, हॉटेल, ट्रॅव्हर्ल्स चालकांसह फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली. त्यामुळे वाहतुकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत अनेक शासकीय कार्यालये आहेत. यात आरटीओ कार्यालय, पेट्रोलपंप, व्यावसायिक दुकाने, जिल्हा परिषद, वनविभाग, पंचायत समिती, तहसील व एसडीओ कार्यालय, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, विविध हॉटेल, बार, अन्य शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाणे यांचा समावेश आहे. खासगी व व्यावसायिक कार्यालयात जिल्ह्यातून विविध कामानिमित्त येणाऱ्यांची मोठी संख्या असते. दुचाकी व चारचाकी वाहनांनी नागरिक येत असल्याने भर महामार्गावरच वाहने उभी ठेवली जात आहेत. अनेक फुटपाथ व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने शासकीय कार्यालयांत प्रवेश करण्यास कठीनाईचा सामना करावा लागतो आहे.

यावर उपाय म्हणून भंडारा नरपालिका, जिल्हा वाहतूक शाखा व महामार्ग पोलिसांनी अतिक्रमण हटविण्याची माहिम हाती घेतली.प्रशासनाकडून यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, अखेरपर्यंत अनेकांनी अतिक्रमणे जैसे थे ठेवल्याने मंगळवारला अतिक्रमण हटाव दस्त्याने बलडोजर लावून अतिक्रमणे पाडली. तर अतिक्रमण हटाव दस्त्याने अनेकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. दुपारी ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावरील ऑफीसर क्लबपासून सुरू करण्यात आली. नागपूर नाकापर्यंत ही कार्यवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी, जिल्हा वाहतूक शाखा व महामार्ग पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

फुटपाथ व्यावसायिकांना जागा द्या

अतिक्रमण हटाव मोहिमेत फुटपाथ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. शहरात फुटपाथ व्यावसायिकांना जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित फुटपाथ व्यावसायिकांनी केली आहे. नगरपालिका प्रशासन याकडे अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आला.