शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

अड्याळ परिसरात विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 00:27 IST

पवनी तालुक्यातील अड्याळ व ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्रात ३.१७ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

जि.प. क्षेत्रातील कामे : ३.१७ कोटी रुपयांची कामे राजेश डोंगरे यांनी खेचून आणलीपवनी/अड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ व ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्रात ३.१७ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी अल्पावधीतच कोट्यावधीची कामे खेचून आणले. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांचा विकास हे ध्येय मनाशी बाळगून आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात विकासात्मक कामांच्या झंझावातातून वाटचाल करीत ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्रात २५ तर अड्याळ जिल्हा परिषद क्षेत्रात १५ कामे मंजूर करून भक्तनिवास, पाईपलाईन, सभामंडप, रस्ते व नाली बांधकाम, मोरी बांधकाम अशा विविध कामांचा समावेश आहे. १५ एप्रिलला दुपारी नेरला डोंगर महादेव भक्त निवासाचे भूमिपूजन, चिचाळ येथे विकासकामांचे भूमिपूजन, शेंद्री (बुज) येथे बुद्धविहाराचे लोकार्पण, ब्रम्ही येथे विकासकामांचे भूमिपूजन, निघवी येथे विकासकामांचे भूमिपूजन, भेंडारा येथे विकासकामांचे भूमिपूजन व सभामंडपाचे लोकार्पण तर सायंकाळी रुयाळ येथे ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी राज्यमंत्री विलासराव श्रृंगारपवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, सभापती नरेश डहारे, सभापती शुभांगी रहांगडाले, बाजार समितीचे सभापती लोमेश वैद्य, नेरलाचे सरपंच अनिल कोदाने, चिचाळचे सरपंच उषा काटेखाये, ब्रम्हीच्या सरपंच रिता धावडे, निघवीच्या सरपंच मनिषा फुंडे, भेंडाळाचे सरपंच भारती राणे, रुयाळचे सरपंच कविता मोटघरे, उपसरपंच श्रीकांत भोगे, पं.स. सदस्या मंगला रामटेके, डॉ.विजय ठक्कर, शैलेश मयूर, नंदू कुर्झेकर, मनोरता जांभुळे, सुनंदा मुंडले कुंडलीक काटेखाये, शरद काटेखाये, अनिल धकाते, सुधा इखार वनिता वैरागडे, चेतक डोंगरे, तोमेश्वर पंचभाई, जि.प. सदस्य पारबता डोंगरे यांच्यासह पवनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)