शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या बालसमुद्र तलावात सापडले बौद्धकालीन शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:24 IST

Bhandara News प्राचीन नगरी पवनी येथील किल्ल्याजवळील बालसमुद्र या तलावात बौद्धकालीन शिल्प सापडले असून हे शिल्प एका मोठ्या शिल्पाचा तोडलेला भाग असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे मोठ्या शिल्पाचा तोडलेला भाग असण्याची शक्यता

 लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : प्राचीन नगरी पवनी येथील किल्ल्याजवळील बालसमुद्र या तलावात बौद्धकालीन शिल्प सापडले असून हे शिल्प एका मोठ्या शिल्पाचा तोडलेला भाग असल्याचे दिसून येते. पवनी येथील माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी व आनंद विलास रामटेके यांच्या निदर्शनास हे शिल्प आले. त्यांनी शिल्प तलावाच्या बाहेर काढून जगन्नाथ स्तूपाच्या परिसरात ठेवले आहे.

ऐतिहासिक व प्राचीन नगर म्हणून पवनीची ओळख आहे. या नगरीला बौद्ध धम्माचा इतिहास आहे. या परिसरात जगन्नाथ, चांडकापूर व हरदोलाल नावाने ओळखले जाणारे तीन बौद्ध स्तूप उत्खननात सापडले आहेत. त्यापैकी जगन्नाथ स्तूप तहसील कार्यालयाजवळ असून चांडकापूर स्तूप पुरातन ब्रह्मपुरी-चांदा मार्गावर आहे. हरदोलाल नावाने प्रसिद्ध स्तूप पवनी-खापरी मार्गाच्या बाजूला आहे.

जगन्नाथ स्तूप असलेल्या जागेचे भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्खनन केले आहे. या उत्खननात अनेक बौद्ध शिल्प व शिलालेख सापडले आहेत. त्यापैकी मुचलिंद नागराजाचे व नागस पंचनिकायस असे ब्राह्मी लिपीतील शिलालेख व शिल्प प्रसिद्ध आहेत. तसेच विविध दात्यांनी दिलेल्या दानाचे शिलालेख देखील आहेत. जगन्नाथ मंदिराच्या परिसरात विखुरलेल्या अवशेषांची तोडफोड करून विध्वंसक प्रवृत्तीच्या व्यक्तीने जवळच्या बालसमुद्र तलावात फेकून दिले आहेत. त्यापैकी अशाच एका मोठ्या शिल्पाचा तोडलेला भाग या तलावाच्या काठावर सापडला आहे. चौकीदार जनार्दन खरकाटे यांच्या मदतीने शिल्प बाहेर काढून सुरक्षित ठेवले आहे. तलावात असे अनेक शिल्प असावेत, असा अंदाज आहे.

शिल्पावर धम्मचक्र

बालसमुद्र तलावात आढळलेल्या शिल्पावर धम्मचक्र कोरलेले आहे. त्यामुळे त्याचे मोठे महत्त्व आहे. या शिल्पाचा पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा व हे शिल्प कोणत्या संदर्भात आहे, याचे संशोधन करावे तसेच शिलालेखांचे संरक्षण करावे, अशी मागणी माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी यांनी केली आहे.

टॅग्स :historyइतिहास