शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या कडपांना अंकुर फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:14 IST

अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाला आधी रोगाने मारले आणि आता पावसाने. येथील शेतकºयांनी करायचे तरी काय?

ठळक मुद्देप्रसाशनाचे दुर्लक्ष : बळीराजा पुन्हा संकटात, अड्याळ परिसरातील व्यथा

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धानाला आधी रोगाने मारले आणि आता पावसाने. येथील शेतकºयांनी करायचे तरी काय? दिवाळी आनंदात जावी म्हणून येथील शेतकºयांनी अथक परिश्रम घेतले. पण शेवटी निसर्गाने दगा दिला. मागील दिवसात आलेल्या पावसाने बºयाच शेतकºयांच्या धानाच्या कडपा ओल्या झाल्याने धानाला अंकुर आले आहेत. काही धान हे काळे कुट्ट पडले आहेत. काही शेतकºयांचे शेतात उभे असणारे धानपिक हे जमीनदोस्त झाले आहे.शेतकºयांचे आर्थिक बजेट ज्यावर पूर्णत: अवलंबून असते अशा शेतकºयाने अशावेळी करायचे तरी काय? मुलीचे लग्न, हातऊसणवारी देणे, अशावेळी काय करायचे? सण, उत्सवानिमित्त लागणारा पैसा कुठून आणायचा? दरवेळेला हीच समस्या राहिली तर शेतकºयांनी करायचे तरी काय?.धानाला २८०० रूपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, ही मागणी कधी पूर्ण होणार असा प्रश्नही शेतकरी विचारीत आहेत.अड्याळ व परिसरातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त झाला असला तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे बोलले जात आहे.अड्याळ व परिसरातील शेतकरी सध्या धास्तावलेल्या स्थितीत आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे जे करायला गेले तेथे अपयशच. या आधी हलक्या आणि भारी धानावर रोगाची लागण आली असताना शेतकºयांनी त्यासाठी जे नाही ते औषध फवारणी केली होती. त्यानंतर एका पाण्याने हातची फसल जाणार म्हणून दिवसरात्र शेतात राहून शेतीला पाणी दिले आणि आता सर्व बाजू बरोबर असताना मात्र निसर्गानेच दगा दिला आणि तोंडचा घास हिरावल्यासारखे झाले. परिसरातील नेतेमंडळी यावेळी गप्प का? असे बोलल्या जाते.दरवेळेला काही ना काही स्थिती उत्पन्न होते आणि त्याची सर्वात आधी झळ शेतकºयांना भोगावी लागते. प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेऊन शेतकºयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी यावेळी होत आहे.