शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’ने वाढविली ग्राहकांची डोकेदुखी!

By admin | Updated: December 24, 2015 00:38 IST

भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) सेवा सद्या शहर तथा परिसरातील ग्राहकांसाठी सोयिस्कर ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे.

ग्राहकांमध्ये रोष : सीयूजी प्लॉनमध्ये मोठ्या प्रमाणात बदलतुमसर : भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) सेवा सद्या शहर तथा परिसरातील ग्राहकांसाठी सोयिस्कर ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे. संवादादरम्यान भ्रमणध्वनी अचानक 'डिसकनेक्ट' होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने ग्राहकांना नाहक मन:स्ताप सोसावा लागत असून, यामुळे 'बीएसएनएल'प्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या 'मोबाईल'च्या स्पर्धेत विविध खासगी कंपन्यांनी उडी घेतल्याने या क्षेत्रातील कधीकाळी 'दादा' म्हणून गणल्या जाणाऱ्या 'बीएसएनएल'ची ग्राहक संख्या पुर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. असे असताना भारत संचार निगमने आपला कारभार सुधारण्याऐवजी अधिकच समस्या निर्माण करुन ठेवल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. रिसोडमध्ये सद्या 'बीएसएनएल मोबाईल सीम' वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या सुमारे १० हजार आहे. त्यातुलनेत 'लॅन्डलाईन' ग्राहकांची संख्या मात्र संपूर्ण तालुक्यात हजारापेक्षाही कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, ग्राहकांच्या सेवेत सदैव अग्रेसर राहण्याची वल्गना करणाऱ्या 'बीएसएनएल'चा कारभार गेल्या अनेक महिण्यांपासून खोळंबला आहे. शहरात सद्या खासगी मोबाईल कंपन्यांसह 'बीएसएनएल'चे टॉवर उभे आहेत. असे असले तरी ग्राहकांचा अधिक कल बीएसएनएल आणि खासगी कंपनीचे सीम वापरण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. गत तीन वर्षांपूर्वी 'बीएसएनएल'ने सीयुजी प्लान सुरु करुन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. खास शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली. परिणामी, सवर्सामान्य ग्राहकांसोबतच खेड्यापाड्यांमधील शेतकऱ्यांनी इतर कंपन्यांकडे पाठ फिरवून 'बीएसएनएल'च्या सीयुजी प्लानला सर्वाधिक पसंती दिली. मात्र, काही दिवसांतच 'बीएसएनएल'ने सीयूजी प्लानमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करुन सुविधा कमी केल्या. त्यामुळे ग्राहकांना दरमहा आर्थिक भूर्दंड बसण्यासोबतच 'बीएसएनएल'च्या सेवेतील व्यत्ययामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)