शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

धावत्या बसमध्ये सरपटणाऱ्या प्राण्याचा महिलेला दंश

By admin | Updated: July 7, 2017 00:53 IST

तुमसर आगाराच्या धावत्या बसमध्ये एका महिलेच्या पायाला सरपटणाऱ्या प्राण्याने चावा घेतला. रक्तस्त्राव

महिलेवर तुमसरात उपचार सुरू : तुमसर-अकोला बसमधील प्रवाशांमध्ये खळबळ लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तुमसर आगाराच्या धावत्या बसमध्ये एका महिलेच्या पायाला सरपटणाऱ्या प्राण्याने चावा घेतला. रक्तस्त्राव झाल्याने या महिलेने एकच आरडाओरड केली. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे बसमधील अन्य प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर चालकाने तातडीने बस थांबविली. सध्या त्या महिलेवर तुमसर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना तुमसर-अकोला प्रवासी बसमध्ये गुरूवारी सकाळी १० वाजता घडली. तुमसर ते अकोला दरम्यान धावणारी जलद बस सकाळी १० वाजता तुमसर येथून ५० ते ५५ प्रवाशांना घेऊन निघाली होती. तुमसर बाजार समितीपुढे धावत्या बसमध्ये कुंदा वैद्य रा.तुमसर यांच्या पायाला काहीतरी रूतल्याचा भास झाला. त्यानंतर त्यांनी पायाकडे बघितले असता रक्तस्त्राव सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पायाला वेदना होऊ लागल्यामुळे त्यांनी खाली वाकून बघितले असता त्यांना सीटच्या खाली काहीतरी सरपटणारा प्राणी दिसला. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चालकाने तिथेच बस थांबविली. बसमधील सर्व प्रवाशी एका पाठोपाठ खाली उतरले. बसवाहक व चालकाने घडलेला प्रकार आगारप्रमुखांना भ्रमणध्वनीवर सांगितला. आगारातून अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण बसची तपासणी केली असता तिथे काहीच आढळले नाही. चालक व वाहकांची खात्री झाल्यावर बस पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आली. त्यानंतर, कुंदा वैद्य यांना तुमसर उपजिल्हा रूग्णालयात तातडीने हलविण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुमसर उपजिल्हा रूग्णालयात कुंदा वैद्य यांच्यावर उपचार सुरू असून तो दंश कशाचा आहे, याची तपासणी सुरू आहे. त्यांना निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. -डॉ. सचिन बाळबुद्धे, अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, तुमसर. तुमसर-अकोला बसच्या चालक वाहकाला बसची तपासणी केल्यानंतरच बस पुढील प्रवासाकरिता नेण्याच्या सूचना देण्यात आली. अन्यथा बस परत डेपोत आणावे, अशी सूचना दिली होती. - नितीन उजवणे, आगारप्रमुख तुमसर.