शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीआरएसपीचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:01 IST

ईव्हीएम या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रातून देशभरात घेण्यात येणाऱ्या निवडणुका विश्वासार्ह नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्या,....

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : लोकशाही सशक्त करा

आॅनलाईन लोकमतभंडारा : ईव्हीएम या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रातून देशभरात घेण्यात येणाऱ्या निवडणुका विश्वासार्ह नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्या, यासह अन्य मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारला आंदोलन करण्यात आले.लोकशाहीप्रधान भारतातील लोकशाही सशक्त करण्यासाठी देशात होणाऱ्या निवडणुका नि:ष्पक्ष होणे आवश्यक आहे. मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अनेक प्रगत देशाने ईव्हीएमची विश्वासार्हता फेटाळून लावली आहे. लोकशाहीला तडे जाणार नाही, यासाठी ईव्हीएमच्या माध्यमातून होणारी निवडणूक बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्या. निवडणुकीला पारदर्शक स्वरूप प्राप्त व्हावे व लोकशाहीची होणारी गळचेपी थांबवावी, यासाठी राज्यभर बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ महासचिव झेड. आर. दुधकुंवर यांच्या अध्यक्षतेखाली धरणे देण्यात आले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांच्यामार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, निवडणूक आयोग, मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. धरणे आंदोलनात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महासचिव राजेश बोरकर, अध्यक्ष कन्हैया शामकुंवर, डॉ.महेंद्र गणवीर, सुरेश मोटघरे, मनोज बन्सोड, विश्वनाथ भुसारी, चंद्रभान कांबळे, प्रफुल डोंगरे, रत्नाकर नंदागवळी, प्रा. मधुकर ऋषेश्वरी, सोमेश्वर रामटेके, छत्रपाल उके, अनिल भोवते, संदीप मोटघरे, राजेश टेंभूर्णे, सूर्यकांत हुमणे, ऊषा मोटघरे, देवेश शेंडे, गोपाल हुमणे, हेमा गजभिये, अमित जनबंधू, महेश मेश्राम, संदिप खोब्रागडे, अनिल लोनकर, प्रल्हाद रामटेके, मनोज गोस्वामी, सुभाष गवई, निर्भय गायकवाड, जोत्सना गजभिये, शैलेश जांभुळकर आदी उपस्थित होते .