शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ, पक्षाची तिकीट कोणत्या कामाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली होती. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नामांकन दाखल केले. मात्र नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ व पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गातील जागांवर निवडणुकीला स्थगिती आली. या प्रवर्गातील ज्या उमेदवारांना पक्षाची तिकीट मिळाली ती आता कोणत्या कामाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहूना सर्वच निवडणूक प्रक्रीया रद्द होणार काय या प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्वांच्या नजरा १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या निर्णयाकडे लागल्या आहेत. तसेच रिंगणातील उमेदवारांमध्येही धास्तीचे वातावरण आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली होती. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नामांकन दाखल केले. मात्र नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १३ व पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. एकूण या २८ जागांवर जे उमेदवार उभे होते त्यांनी जीवाचे रान करून पक्षाचे तिकीट (एबी फार्म) मिळविले होते. ऐनवेळी निवडणूक प्रक्रीयेला स्थगिती मिळाल्याने या प्रवर्गातील उमेदवरांची प्रचंड निराशा झाली. भाऊ आम्हाला मिळालेल्या पक्षाची तिकीट आता कोणत्या कामाची, असा सवालही उपस्थित होत आहे.१३ डिसेंबरला निर्णय काय होईल ते होईल. तोपर्यंत अन्य निवडणुकांबाबत संभ्रमता कायम आहे. एकाच वर्गातील काही विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची व काहींना स्थगिती द्यायची काय, असा सवालही व चर्चा उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. ६ डिसेंबरला ओबीसी जागांवरील निवडणूक स्थगितीची माहिती समोर आल्यानंतर उर्वरित जागांवर निवडणुका होतील, असे चित्र स्पष्ट झाले होते. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. दरम्यान काही उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर आपल्या क्षेत्रात प्रचाराचा नारळही फोडला. मात्र स्थगितीच्या आदेशानंतर व ओबीसी संघटनांनी घेतलेल्या निर्णयांमुळे प्रचारातील नारळाचा फुसका बार होणार काय, अशीही चर्चा रंगली आहे. 

शिगेला पोहचली उत्सुकता

- जिल्हा परिषदेच्या ३९ जागांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरूष आणि १६३ महिलांचा समावेश आहे. १०४ पैकी ७९ पंचायत समितीच्या जागांसाठी ५४४ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र ओबीसी प्रवर्गातील जागांवर निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर आता या सर्वांमध्ये अस्वस्थता व्याप्त आहे. -  १३ डिसेंबरला काय निर्णय होतो याची प्रत्येकाच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. १३ डिसेंबरलाच उमेदवार मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणुका झाल्यास चिन्ह वाटप व खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात होईल. मात्र निवडणूक रद्दचा निर्णय झाल्यास सर्व प्रक्रीया तिथेच थांबणार आहे.

तर पैसा पाण्यात- राजकारण म्हटले की पैसा पाण्यासारखा ओतावा लागतो. जीवाचे रान करून पक्षश्रेष्टींकडून तिकीट मिळविण्यासाठी मेहनत घेतली. कार्यकर्त्यांपासून ते बॅनरपर्यंतचा खर्च झाला. निवडणुका घोषित होण्यापुर्वी मतदारांमध्ये सातत्य ठेवण्यासाठीही आर्थिक भार सहन करावा लागला. आता निवडणुका होणार की नाही याबाबत संभ्रमता कायम आहे. निवडणुका रद्द झाल्या तर पैसा पाण्यात जाणार काय, अशी खमंग चर्चाही व तशी भीतीही उमेदवारांना लागली आहे. आता नजरा फक्त निर्णयाकडे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद