शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर पडले अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:26 IST

गावात येणाऱ्या प्रत्येक आगंतुकाच्या इत्थंभूत माहितीची नोंद असणारे महत्वाचे दस्तावेज म्हणजे ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर.

ठळक मुद्देपोलीस पाटील करतात नोंदी गुन्हेगारांचा माग काढणारे महत्त्वाचे दस्तावेज

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गावात येणाऱ्या प्रत्येक आगंतुकाच्या इत्थंभूत माहितीची नोंद असणारे महत्वाचे दस्तावेज म्हणजे ब्रिटिशकालीन मुसाफिरी रजिस्टर. पोलीस पाटलांकडे असलेल्या या रजिस्टरमधील नोंदीवरून गुन्हेगारांचा माग काढण्यात मोठी मदत व्हायची. आपल्या हद्दीत गुन्हा घडला की पोलीस प्रथम याच रजिस्टरचा आधार घ्यायचे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मुशाफिरी रजिस्टर अडगळीत पडले असून प्रशासनालाही याचा विसर पडल्याचे दिसत आहे.प्राचीन काळापासून गावाचा कारभार सांभाळण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यातूनच मुसाफिरी रजिस्टरचा जन्म झाला असावा. माहिती ठेवण्याची पद्धत इंग्रजांनी देशात सुरू केल्याचे सांगितले जाते. मात्र नेमकी ही पद्धत केव्हा सुरू झाली हे आज कुणालाही सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी गावकुसाबाहेर पाल ठोकून राहणाºयांची संख्या मोठी असायची. अनेक कुटुंब उपजीविकेसाठी सतत भटकंती करायचे. या मंडळींची नोंद विशिष्ट बांधणीच्या मुसाफिरी रजिस्टरमध्ये घेतली जायची. त्यात गावात आलेल्या अनोळखी व्यक्तीचे पूर्ण नाव, गाव, जात, व्यवसाय, कोणत्या गावावरून आले, कोणत्या गावाला जाणार, गावात किती दिवस मुक्काम आहे. सोबत कोण-कोण आहे यासह अंगावरील ओळखचिन्हांची नोंद घेतली जाते. गावात अनोळखी आला की सर्वप्रथम कोतवाल पोलीस पाटलांना सूचना देतो. त्यांची नोंद घेतली जाते.एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्यास सर्वप्रथम या रजिस्टरचा आधार घेतला जायचा. त्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा शोध घेऊन गुन्ह्यांचा छडा लावला जायचा. राज्यात अनेक गुन्ह्यांचा शोध लागण्यात मुसाफिरी रजिस्टरने महत्वाची भूमिका बजावली. प्रत्येक गावातील पोलीस पाटील आजही यात न चुकता नोंदी घेत आहेत. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या रजिस्टरचे महत्व कमी होत आहे. पोलीस विभाग आता या रजिस्टरकडे पाहायलाही तयार नाही. विविध कामांसाठी महत्वाचे दस्तवेज ठरू पाहणारे हे रजिस्टर आता अडगळीत पडले आहे.

रजिस्टरमधील नोंदीवरून मिळाले जात प्रमाणपत्रजात प्रमाणप्रत्र काढण्यासाठी पूर्वजांच्या जातीचा उल्लेख असलेले अभिलेखे ग्राह्य धरले जातात. जन्ममृत्यूची नोंद असणारे कोटवार बुक महत्वाचा पुरावा मानला जातो. मात्र सतत भटकंती करणाऱ्यांच्या अशा नोंदी सापडणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. असा अनुभव वडार आणि मांगगारुडी समाजातील काही व्यक्तींना आला. मात्र भंडारा जिल्ह्यातील एका गावात मुसाफिरी रजिस्टरमध्ये असलेल्या जातीच्या नोंदीवरून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झाली. एवढे महत्वाचे दस्तावेज आता दुर्लक्षित होत आहे.गावात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीची नोंद आजही मुसाफिरी रजिस्टरमध्ये घेतली जाते. आमच्या पिंडकेपार गावच्या रजिस्टरमध्ये १९६७ पासूनच्या अद्ययावत नोंदी आहेत. पूर्वीचे रजिस्टर जीर्ण झाले आहेत. त्यामुळे शासनाने या रजिस्टरचे डिजिटलायझेशन करावे. त्याचा उपयोग सामाजिक इतिहास संशोधकांना होऊ शकतो.-सुधाकर साठवणे, जिल्हाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना, भंडारा.

टॅग्स :Governmentसरकार