भंडारा : शहरातील स्कूल आॅफ स्कॉलर्स या शाळेतील विद्यार्थ्यांशी ब्रिटिश कॉन्सिलच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. ब्रिटिश कॉन्सिल ही एक संस्था असून शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवित असते. ज्यामुळे विद्यार्थी आपल्या चांगल्या भविष्यासाठी तयार होतो. ब्रिटीश कॉन्सिलतर्फे वेगवेगळ्या विषयानुरुप वेगवेगळे उपक्रम येथे घेण्यात आले. आतापर्यंत १३०० शाळा ब्रिटीश कॉन्सिलसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांची अध्ययन अध्यापन पध्दती वेगळी आहे.स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेत २०१३ पासून २०१६ पर्यंत आयएसए तर्फे गौरवास्पद ठरेल हे असे कार्यक्रम राबविण्यात आले. शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी हे आंतरराष्ट्रीय शिक्षण प्राप्त करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. ज्यामध्ये शाळेतील उपक्रम सहपाठी हॉर्सले प्राथमिक शाळा लंडन सोबत मिळून घेत आहेत. हॉर्सले शाळेतील काही शिक्षकांनी स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेत शैक्षणिक भेट दिली व विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला. त्यांना विविध गोष्टी तर्कसंगत पद्धतीने समजावून सांगितल्या. स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेच्या शिक्षकांनी देखील हॉर्सले प्राथमिक शाळा लंडन इथे भेट दिल्याची माहिती देण्यात आली. शाळेतील विद्यार्थी फक्त शाळेतच प्रगती करत नाही तर आंतरराष्ट्रीय शिक्षण देखील प्राप्त करत आहेत. मुख्याध्यापिका इरा शर्मा कार्यक्रमाचे संचालन केले. (प्रतिनिधी)
ब्रिटिश कॉन्सिलच्या प्रतिनिधिंनी साधला संवाद
By admin | Updated: March 18, 2016 00:43 IST