शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

एक रोपटे आणा ५० रुपये घेऊन जा

By admin | Updated: June 29, 2016 00:42 IST

केंद्र तथा राज्य शासनाने वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. तर चिखला येथील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना एका झाडाचे रोपटे आणून द्या व ५० रुपये न्या.

ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम : चिखला गाव हिरवेगार करण्याचा सोडला संकल्पतुमसर : केंद्र तथा राज्य शासनाने वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. तर चिखला येथील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना एका झाडाचे रोपटे आणून द्या व ५० रुपये न्या. असा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. ग्रामस्थांमध्ये येथे चढाओढ लागली असून संपूर्ण गाव हिरवेगार करण्याचा संकल्प ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे.तुमसरपासून २५ कि.मी. अंतरावर चिखला हे गाव आहे. या गावाशेजारी जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणी (भूमीगत) आहेत. गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार इतकी आहे. डोंगराळ परिसर असून सातपुडा पर्वत रांगात हा परिसर येतो. परंतु मागील काही वर्षापासून हा परिसर उजाड झाला आहे. हिरवे पहाड ही उजाड पडले आहेत. झाडांना नष्ट करण्याकरिता शेकडो जण येतात. परंतु झाडे लावण्याकरिता शेकडो हात कसे पुढे सरसावतील याकरिता चिखला येथील सरपंच उमा सेनकपाट व तरुणतुर्क उपसरपंच दिलीप सोनवाने तथा ग्रामपंचायत सदस्यांनी एक नवीन शक्कल लढविली व ती येथे यशस्वी होताना दिसत आहे.गावातील ग्रामस्थांनी एका झाडाचे रोपटे आणले तर त्यांनी ५० रुपये प्रती रोपटे ग्रामपंचायत चिखला देणार आहे. याचा परिणाम इतका झाला की चिखला येथे बऱ्याच कुटुंबांनी रोपटे लावणे सुरु केले आहे. शासनाकडून विनामुल्य झाडे न घेता ग्रामस्थांकडून घेऊन संपूर्ण गाव व परिसर हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. चिखला या गावापासून इतर गावांशी वसा घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)