शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा

By admin | Updated: February 11, 2017 00:25 IST

आरोग्य आपल्या दारी ही शासनाची भूमिका असून आरोग्य विभागाने आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवावी, ...

दीपक सावंत : महाआरोग्य मेळावा, दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपभंडारा : आरोग्य आपल्या दारी ही शासनाची भूमिका असून आरोग्य विभागाने आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवावी, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने आयोजित महाआरोग्य मेळावा व रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे हे होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय जयस्वाल, सहाय्यक जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके आदी उपस्थित होते.प्रत्येक नागरिकांनी व्यक्तीगत स्वच्छता राखल्यास आजाराची संख्या निश्चित कमी होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, हात स्वच्छ धुतल्यास निम्मे आजार कमी होण्यास मदत होईल. महाआरोग्य मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा इलाज तर केला जाईलच सोबतच तो आजार मुक्त होईपर्यंत पाठपूरावा सुध्दा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. महिला रुग्णालयाच्या संदर्भात पालकमंत्री म्हणाले, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीकडे हा विषय आहे. राज्यात जिल्हा परिषदांची आचार संहिता असल्यामुळे हा विषय सद्या प्रलंबित असला तरी पुढील एका महिन्यात महिला रुग्णालयाचा प्रश्न निकाली निघेल.आमदार अवसरे म्हणाले, नेत्रदान, अवयवदान व रक्तदान हे तीन दान श्रेष्ठ आहेत. मात्र आरोग्य शिबीराला गर्दी होणे ही बाब आरोग्याच्या दृष्टीने खुप चांगली नाही. पवनी येथे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, महाआरोग्य मेळाव्यात तपासणी करणाऱ्या सर्व रुग्णांचा ते पूर्ण बरे होईपर्यत पाठपूरावा ठेवला जाईल.या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना पालकमंत्री डॉ. सावंत यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ७ नोव्हेंबर २०१६ ते २७ नोव्हेंबर २०१६ या दरम्यान दिव्यांग वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ३९१ लाभार्थी पात्र ठरले आहे. या कार्यक्रमात अवयवदान अभियानात योगदान देणारी संस्था, मरणोपरांत नेत्रदान करणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक व अवयवदान संमत्तीपत्र देणारे भैयालाल निमजे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी केले. (प्रतिनिधी)