शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST

भंडारा : केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत २०१६ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून दारिद्र्य रेषेखालील तसेच गरीब कुटुंबीयांना मोफत गॅसचे कनेक्शन देण्यात ...

भंडारा : केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत २०१६ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून दारिद्र्य रेषेखालील तसेच गरीब कुटुंबीयांना मोफत गॅसचे कनेक्शन देण्यात आले होते. देशात पाच कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसची झालेली दरवाढ व सर्वसामान्यांचा रोजगार फिरवल्याने महिलांचा स्वयंपाक हा चुलीवरच सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशात महागाईचा भडका वाढला असून या वाढत्या किमतीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आधीच आवश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून त्यात केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची भाववाढ करून गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली आमच्यावर, असा टाहो ग्रामीण भागातील महिलांनी फोडला आहे. तर उज्‍ज्वला योजनेचा फायदा तरी काय, अशीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तब्बल एक हजार रुपयांवर गॅस पोहोचल्याने अनेक महिला या जंगल, शेतशिवारात आकडे लाकडे मिळविण्यासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा जीव धोक्यात येत आहे

कोट

सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत आहे. गरिबांनी खर्च कसा भागवावा. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे महागाई वाढत आहे. सरकारने यासाठी काही तरी करायलाच हवे.

अनिता गिरेपुंजे, गृहिणी.

कोट

गरिबांनाच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ परवडणारी नाही. सरकारने वाढत्या महागाईवर काहीतरी नियंत्रण ठेवायला हवे. आणखी किती महागाई वाढणार आहे काय माहीत.

शशिकला मोथरकर,गृहिणी.

कोट

गॅस सिलिंडर वाटून काय फायदा?

खूप गाजावाजा करून उज्ज्वला योजना गरिबांसाठी असल्याचे सरकारने गरिबांना गॅस सिलिंडर स्वस्तात दिले; पण आज ग्रामीण भागात लाभार्थी गॅस सिलिंडर विकत घेऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. रोजच भरमसाट भाववाढ करून सामान्य माणसांचे जीवन जगणे आता कठीण होत आहे.

- अमित मेश्राम, तुमसर.

कोट

गॅस सिलिंडरची दरवाढ हे सर्वसामान्यांना परवडणारी नाही. मोफत गॅस कनेक्शन ऐवजी सिलिंडर घेण्यासाठी सवलत द्यावी, तरच गरिबांना दिलासा मिळेल.

विद्या धकाते, गृहिणी.