शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणात गुदमरतोय राज्य मार्गाचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:09 IST

तुमसर-बप२ो राज्य मार्गाच्या कडेला असणारी खतकुडे थेट मार्गावर पोहचली आहेत. याशिवाय मार्गावर अतिक्रमण वाढलेले असून गावाचा श्वास गुदमरण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देखतकुड्यामुळे अपघात वाढले : व्यथा तुमसर-बपेरा राज्यमार्गाची

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बप२ो राज्य मार्गाच्या कडेला असणारी खतकुडे थेट मार्गावर पोहचली आहेत. याशिवाय मार्गावर अतिक्रमण वाढलेले असून गावाचा श्वास गुदमरण्याची वेळ आली आहे. राज्य मार्ग मोकळा करण्यासाठी सरपंच पुढाकार घेत असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधण्याची गरज आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गाची लांबी ३० कि.मी. आहे. हा राज्य मार्ग मध्यप्रदेश राज्याला जोडणारा आहे. या मार्गावर डिसेंबर महिन्यात जीवघेणे अपघात घडल्याने राज्यमार्ग चर्चेत आला. या अपघातांना नागरिकांनी बांधकाम विभागाला कारणीभूत धरले आहेत. राज्य मार्गावर खड्डे असून हा राज्य मार्ग दोन भागात विभागला आहे. वाढत्या अपघाताला अतिक्रमण, झुडपे तथा दिशादर्शक फलकाचा अभाव. आहे. राज्य मार्गावर अनेक गावाचे वास्तव्य आहे. गावात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी राज्यमार्गाच्या कडेला थेट तणस व खतकुड्याचे ढिग तयार केले आहेत. हे ढिगारे थेट राज्य मार्गावर आले आहेत. या ढिगामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. समोरील वाहने या ढिगाऱ्यामुळे दिसत नाही. राज्य मार्गावरील अपघात टाळण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. या वळणावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे वळणावर वाहनधारक भ्रमित होतात. बांधकाम विभाग निधीचा वाणवा असल्याचे सांगत आहे. राज्य मार्गावर जीवघेणे अपघात चिंतेचा विषय झाल्याने सरपंचांनी पुढाकार घेतला आहे. बांधकाम विभागाने झुडपी, खड्डे, फलक तथा गावातील सरपंचांसोबत समन्वय साधून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.गावातील रस्त्यावर शेतीचे अतिक्रमणगाव शिवारांना जोडणारे रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. सिहोरा परिसरात असणारे रस्ते खड्डेमय आहे. हे रस्ते वाढत्या झुडुपांनी दिसेनाशी झाली असून या मार्गावर जनावरे बांधण्यात येत आहेत. शेतशिवारातून जाणारा रस्ता शेतीच्या हद्दीत गिळंकृत झाला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. महालगाव ते गोंडीटोला मार्गाने प्रवास करताना वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बिनाखी ते सुकळी मार्गावर झुडप वाढल्यामुळे अपघात वाढत आहेत.राज्यमार्गालगत घरांचे वास्तव्य असून बहुतांश शेतकरी आहेत. जागेच्या अभावाने तणीस व खातकुडे तयार केले आहेत. समन्वयातून राज्य मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.-नितीन गणवीर, सरपंच, हरदोली.