शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

झाडांचा गुदमरतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:53 IST

वृक्ष लागवड अभियान सर्वत्र राबविण्यात येत असून विशेषत: शहरात वृक्ष लावगड व वाढीकरिता विशेष प्रयत्न केले जातात. तुमसरात सिमेंट रस्त्याच्या शेजारी पूर्वी लावलेल्या वृक्षांची वाढ होत आहे. परंतु सिमेंट रस्त्याच्या काठावर सिमेंटचे गट्टू लावताना वृक्षाच्या बुंध्यापर्यंत सिमेंट कामे केली गेलीत. यामुळे वृक्षांचा श्वास गुदमरत आहे.

ठळक मुद्देगट्टू लावले झाडांच्या बुंद्यांपर्यंत : वाढीवर विपरीत परिणाम

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वृक्ष लागवड अभियान सर्वत्र राबविण्यात येत असून विशेषत: शहरात वृक्ष लावगड व वाढीकरिता विशेष प्रयत्न केले जातात. तुमसरात सिमेंट रस्त्याच्या शेजारी पूर्वी लावलेल्या वृक्षांची वाढ होत आहे. परंतु सिमेंट रस्त्याच्या काठावर सिमेंटचे गट्टू लावताना वृक्षाच्या बुंध्यापर्यंत सिमेंट कामे केली गेलीत. यामुळे वृक्षांचा श्वास गुदमरत आहे.तुमसर शहरात खापा टोली श्रीरामनगर परिसरातून आंतरराज्यीय मार्ग जात असून आंतरराज्यीय रस्ता सिमेंटचा तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या अगदी कडेला गट्टू लावण्यात आले. येथे लहान पण डेरेदार व उन्हाळ्यातही हिरवीगार राहणारी झाडे यापूर्वी लावण्यात आली होती. दिवसेंदिवस ती वाढत आहेत. त्या झाडांची काळजी व निगा ठेवल्याने ती मोठी होत आहेत. शहराच्या सौंदर्यात ही झाडे निश्चितच भर घालीत आहेत. शहरातील सिमेंट काँक्रीटच्या जंगलात हिरवीगार झाडे मनाला आकर्षित करतात. शुद्ध हवा देण्याची प्रमुख जबाबदारी निश्चितच ही झाडे बतावित आहेत.मागील एका आठवड्या भरापासून रस्त्याच्या कडेला सिमेंटचे गट्टू लावण्याचे काम सुरू आहे. मुळ बुद्धांपर्यंत केवळ काही इंच जागा सोडून नावापुरती सर्व जागा गट्टू व सिमेंटने व्यापली आहे. केवळ बुंधा तेवढा येथे सोडल्याचे दिसून येते. पाऊसाचे पाणी किंवा उन्हाळ्यात पाणी कुठे देणार असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. झाडाला श्वास येथे गुदमरल्यासारखी स्थिती झाली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी याबाबत लोकमतकडे तक्रार केली. तांत्रिकदृष्ट्या झाडे यामुळे वाढणार नाहीत. स्थापत्य अभियंता तथा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे दखल घेण्याची गरज आहे.नियमानुसार झाडे लावताना किमान किती जागा हवी याचे साधे उदाहरण सर्वांना माहित आहे. गट्टू लावणाºया गारागीरांना किमान ते माहिती नसावे, परंतु संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान पर्यावरण संवर्धन करणाऱ्या लहान वृक्षांबाबत दखल घेण्याची गरज आहे.खापाटोली परिसरात पेट्रोल पंपासमोर गट्टू झाडांच्या अगदी बुंध्यापर्यंत बसविण्यात आले. झाडांची सध्या वाढीचे दिवस आहेत. झाडांची येथे यामुळे वाढ होण्यास अडथडा निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. उन्हाळ्यात त्यांचा विपरीत परिणाम होईल.-डॉ. विजय पारधी, तुमसर.